एक्स्प्लोर

Vikram S: देशातील पहिले खासगी रॉकेट 'विक्रम एस'चे यशस्वी उड्डाण, नव्या युगाला 'प्रारंभ' 

ISRO Prarambh Mission: विक्रम एसच्या यशस्वी उड्डाणानंतर देशात आता खासगी कंपनीकडून रॉकेट लॉन्चिंग प्रोग्रॅमला सुरुवात झाली आहे. 

नवी दिल्ली: देशाच्या अंतराळ विकास कार्यक्रमाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून पहिलं खासगी रॉकेट विक्रम एस (Vikram-S) चे आज यशस्वी उड्डाण करण्यात आलं आहे. 'मिशन प्रारंभ' (Mission Prarambh) अंतर्गत विक्रम एस या हायपरसोनिक रॉकेटचं सकाळी 11.30 वाजता उड्डाण करण्यात आलं. श्रीहरीकोटातील स्पेस स्टेशनवरून इस्त्रोच्या (ISRO) मदतीने हे उड्डाण करण्यात आलं असून त्यामुळे देशात खासगी रॉकेट विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे इलॉन मस्कच्या स्पेसएक्सप्रमाणे भारतातही खासगी कंपन्यांकडून अंतराळ क्षेत्रात कामगिरी केली जाणार आहे. 

हैदराबादच्या स्कायरुट एरोस्पेस (Skyroot Aerospace) या खासगी कंपनीकडून विक्रम एस या रॉकेटचं लॉन्चिंग करण्यात आलं असून त्याचा वेग आवाजाच्या पाच पटीने जास्त आहे. या लॉन्चिंगसाठी भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संस्था म्हणजे इस्त्रोची मदत झाली आहे. या मिशनला प्रारंभ  (Mission Prarambh) असं नाव देण्यात आलं आहे. या रॉकेटचे विक्रम हे नाव भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या नावावरुन देण्यात आलं आहे.

 

स्पेस किड्झ इंडिया, बॅझूमक्यू आर्मनिया आणि एन स्पेस टेक इंडिया या तीन पेलोड्सचे वहन विक्रम एस या रॉकेटमधून करण्यात आलं आहे. विक्रम एसमध्ये रॉकेटची स्पिनिंग स्थिरता कायम रहावी यासाठी सॉलिड थ्रस्टर्स 3D-प्रिंटचा वापर करण्यात आला आहे. या रॉकेटच्या माध्यमातून भविष्यातील विक्रम सीरिजच्या ऑर्बिटल-क्लास अंतराळ प्रक्षेपण वाहनांसाठी 80 टक्के तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यात येणार आहे. 

विक्रम-एस चे वजन 545 किलोग्रॅम असून त्याची लांबी सहा मीटर तर व्यास 0.375 मीटर आहे. यामध्ये सात टनांचा पीक व्हॅक्यूम थ्रस्टचा वापर करण्यात आला आहे. विक्रम एस हे 83 किलोग्रॅम वजनाचे पेलोड कमाल 100 किलोमीटर उंचीवर वाहून नेऊ शकते.

 

 

 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget