एक्स्प्लोर
Advertisement
भारतात लवकरच 'बिकिनी एअरलाईन्स' सुरु होणार!
व्हिएतजेटमध्ये हवाई सुंदरींच्या बिकिनी ड्रेसवर अनेक वेळा वादही झाला होता.
मुंबई : व्हिएतनाममध्ये बिकिनी एअरलाईन्सने प्रसिद्ध असलेली लो कॉस्ट एअरलाईन्स कंपनी व्हिएतजेट लवकरच भारतात आपला बिझनेस सुरु करणार आहे. एअरलाईन्स लवकरच नवी दिल्लीपासून हो ची मिन्ह सिटीसाठी थेट सेवा सुरु करणार आहे.
या एअरलाईन्सची खास गोष्ट म्हणजे या विमानातील एअरहोस्टेस बिकिनीमध्ये असतात. ह्या एअरलाईन्सची सेवा आठवड्यातून चार वेळा असेल. जुलै-ऑगस्ट महिन्यापर्यंत ही कंपनी भारतात आपला बिझनेस सुरु करण्याची शक्यता आहे.
व्हिएतजेटमध्ये हवाई सुंदरींच्या बिकिनी ड्रेसवर अनेक वेळा वादही झाला होता. पण या वादाला, विरोधाला न जुमानत व्हिएतजेट एअरची सीईओ फुओंग थाओ यांनी कंपनीची वेगळी ओळख निर्माण केली. एअरलाईन्सच्या यशाचा परिणाम म्हणजे कंपनीची सीईओ फुओंग थाओ ह्या व्हिएतनामच्या पहिल्या महिला अब्जाधीश आहेत.
मात्र भारतात या एअरलाईन्सला कसा प्रतिसाद मिळतो आणि इथेही एअरहोस्टेस बिकिनीमध्ये दिसणार का हे पाहणं उत्सुकतेचं आहे. सोशल मीडियावर आतापासूनच याची चर्चा सुरु असून अनेक जण याची वाट पाहत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement