एक्स्प्लोर
ICICI बँकेच्या प्रमुख चंदा कोचर यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं
आयसीआसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर यांना संचालक आणि सीओओ पदावरुन हटवण्यात आलं आहे. त्यांच्या जागी संदीप बक्षी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई: व्हिडीओकॉन कर्जप्रकरणी वादात अडकलेल्या आयसीआसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर यांना संचालक आणि सीओओ पदावरुन हटवण्यात आलं आहे. चौकशीपर्यंत त्यांना पदावरुन दूर करत सक्तीच्या रजेवार पाठवण्यात आलं आहे.
आता त्यांच्या जागी संदीप बक्षी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयसीआयसीआय बँकेने याबाबतचं पत्रक जाहीर करुन ही माहिती दिली.
आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळानं सोमवारी बक्षी यांची संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (COO) नियुक्ती केली. त्यामुळे आता आयसीआयसीआय प्रोडेंशिअलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी संचालक पदावर कार्यरत असलेले बक्षी 19 जूनपासून बँकेचे सीओओ पद सांभाळतील.
बँकेचे सर्व व्यवहार संदीप बक्षी हेच पाहतील. बोर्डाचे सर्व कार्यकारी संचालक आणि व्यवस्थापकीय संचालक सर्वजण संदीप बक्षी यांनाच रिपोर्ट करतील. मात्र संदीप बक्षी बँकेच्या एमडी आणि सीईओ चंदा कोचर यांनाच रिपोर्ट करतील. पण चंदा कोचर जोपर्यंत रजेवर असतील तोपर्यंत संदीप बक्षी बँकेच्या बोर्डाच्या पदाधिकार्यांना रिपोर्ट करतील.
संदीप बक्षी यांना पाच वर्षांसाठी नियुक्त करण्यात आलं आहे.
कोण आहेत संदीप बक्षी?
संदीप बक्षी हे आजपर्यंत आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाईफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पद सांभाळत होते.
आजपासून संदीप बक्षी आयसीआयसीआय बँकेच्या सीओओ पदाचा भार सांभाळतील.
संदीप बक्षी यांच्याकडे आयसीआयसीआय बँकेचे सीओओ पदाचा भार दिल्याने, त्यांच्या रिक्त झालेल्या आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाईफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी एन एस कन्नन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चंदा कोचर यांच्यावरील आरोप
धूत यांच्या व्हिडीओकॉन ग्रुपला 20 बँकांच्या ग्रुपनं कर्ज दिलं होतं. ज्यात आयसीआयसीआय बँकेचा वाटा 10 टक्के होता. मात्र धूत यांनी आयसीआयसीआयकडून मिळणाऱ्या कर्जाच्या बदल्यात चंदा कोचर यांचे पती दीपक यांच्यासोबत मिळून न्यू पॉवर रिन्यूएबल नावानं कंपनी उघडली. ज्यात दीपक यांची 50 टक्क्यांची भागीदारी होती.
हा सरळ सरळ भ्रष्टाचार असल्याचा आरोप करत शेअरहोल्डर अरविंद गुप्तांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून तक्रार केली होती.
वेणुगोपाल धूत आणि आयसीआसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि त्यांच्या दोन नातेवाईकांनी मिळून डिसेंबर 2008 मध्ये एक कंपनी स्थापन केली. या कंपनीला ‘घरच्याच’ आयसीआसीआय बँकेने तब्बल 64 कोटी रुपयांचं कर्ज दिलं. मात्र अवघ्या काही दिवसात या कंपनीची मालकी अवघ्या 9 लाख रुपयात दीपक कोचर यांना मिळाली.
माजी न्यायमूर्तींकडून चौकशी
चंदा कोचर यांच्यावरील आरोपांची चौकशी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती बीएन श्रीकृष्ण यांच्यावर सोपवण्यात आली आहे. न्यायमूर्ती श्रीकृष्ण यांच्या नेतृत्त्वात आयसीआयसीआय बोर्डाने व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणाची स्वतंत्र चौकशी केली आहे. श्रीकृष्ण हे अर्थव्यवहाराचे जाणकार असल्याने ते याप्रकरणाची काटेकोर तपासणी करतील, असा विश्वास आहे.
संबंधित बातम्या
बँक टॅम्परिंग! चंदा कोचर गोत्यात, व्हिडीओकॉनचं 3 हजार कोटीचं कर्ज वादात!
मराठी उद्योजकाला अडचणीत आणण्याचा डाव : वेणुगोपाल धूत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement