एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काँग्रेससह 17 पक्षांकडून उपराष्ट्रपतीपदासाठी गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी
नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेससह 17 विरोधी पक्षांनी आता उपराष्ट्रपतीपदासाठीही नाव जाहीर केलं आहे. विरोधी पक्षांनी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आणि महात्मा गांधी यांचे नातू गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी दिली आहे.
दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांची बैठक झाली. यामध्ये गोपालकृष्ण गांधी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. बैठकीत केवळ गोपालकृष्ण गांधी यांच्याच नावावर चर्चा झाल्याचीही माहिती सुत्रांनी दिली आहे.
राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांकडून माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर आता उपराष्ट्रपतीपदासाठी गोपालकृष्ण गांधी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
सत्ताधारी एनडीएने राष्ट्रपतीपदासाठी रामनाथ कोविंद यांना उमेदवारी दिली आहे. तर उपराष्ट्रपतीपदासाठी अद्याप नाव जाहीर करण्यात आलेलं नाही.
गोपालकृष्ण गांधी यांचा अल्पपरिचय
गोपाळकृष्ण गांधी (जन्म: २२ एप्रिल १९४५) हे एक भारतीय सनदी अधिकारी व पश्चिम बंगाल राज्याचे २००४ ते २००९ दरम्यान पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. गोपालकृष्ण गांधीं हे अशोका विद्यापीठातील इतिहास विभागाचे माजी प्रमुख आणि दक्षिण आफ्रिकेतीत भारताचे राजदूत होते. याशिवाय त्यांनी भारतीय विदेशी सेवेमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली. ते एक विख्यात विद्वान असून गांधी आणि आंबेडकरयंच्या विचारांचे साक्षेपी अभ्यासक होते.
गोपाळकृष्ण गांधी हे महात्मा गांधींचे नातू व देवदास गांधींचे पुत्र आहेत.
उपराष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम:
– 4 जुलैला उपराष्ट्रपती निवडणुकीची अधिसूचना जारी होईल.
– 18 जुलैला निवडणूक अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख
– 21 जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येणार
– 5 ऑगस्टला मतदान
– 5 ऑगस्टलाच मतमोजणी
उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएकडून तीन नावांची चर्चा
उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ 10 ऑगस्टला संपणार आहे. दरम्यान, आता उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून तीन नावांची चर्चा आहे. यामध्ये सर्वात आधी नावं केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांचं आहे. तर त्यानंतर आनंदीबेन पटेल आणि हुकूमदेव नारायण यांच्या नावाची चर्चा आहे.
मात्र, असं असलं तरीही पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा नेमकं कोणाला उमेदवारी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या
राष्ट्रपती निवडणूक : काँग्रेसकडून मीराकुमार यांना उमेदवारी
रामनाथ कोविंद ‘एनडीए’चे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार!
रामनाथ कोविंद यांना JDU-BJD नंतर TRS चंही समर्थन
घटना बदलण्यासाठीच भाजपकडून राष्ट्रपतीपदासाठी दलित उमेदवार : प्रकाश आंबेडकर
राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्याबाबतच्या 10 खास गोष्टी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
Advertisement