एक्स्प्लोर
Advertisement
ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचं निधन
गेली अनेक दशकं कुलदीप नय्यर हे पत्रकारितेत सक्रीय होते, तसेच त्यांनी अनेक पुस्तकं लिहून देशाच्या विचारविश्वातही बहुमूल्य योगदान दिलं.
नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचं वयाच्या 95 व्या वर्षी निधन झालं. दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये काल रात्री कुलदीप नय्यर यांनी अखेरचा श्वास घेतला. गेली अनेक दशकं कुलदीप नय्यर हे पत्रकारितेत सक्रीय होते. तसेच त्यांनी अनेक पुस्तकं लिहून देशाच्या विचारविश्वातही बहुमूल्य योगदान दिलं.
स्वातंत्र्यपूर्व काळात 14 ऑगस्ट 1923 रोजी पंजाब प्रांतातील सियालकोट येथे कुलदीप नय्यर यांचा जन्म झाला. आता सियालकोट पाकिस्तानचा भाग आहे.
लाहोरमधील फोरमन खिश्चन कॉलेजमधून बीए (ऑनर्स) पदवी मिळवून, पुढे लाहोरमधीलच लॉ कॉलेजमधून एलएलबी पदवी संपादित केली. नॉर्थवेस्टर्न यूनिव्हर्सिटीतून नय्यर यांनी पत्रकारितेचं शिक्षण घेतलं.
उर्दू प्रेस रिपोर्टर म्हणून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे ‘द स्टेट्समन’चे संपादक झाले. डेक्कन हेरॉल्ड, द डेली स्टार, द संडे गार्डियन, द न्यू, द स्टेट्समन, द एक्स्प्रेस ट्रिब्युन पाकिस्तान, द डॉन यांसारख्या 80 हून अधिक वृत्तपत्रात 14 भाषांमधून कुलदीप नय्यर यांनी स्तंभलेखन केले आहे. तब्बल 25 वर्षे ते ‘द टाईम्स’ या लंडनमधील वृत्तपत्राचे प्रतिनिधीही ते राहिले.
पत्रकारितेसह ते सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही सक्रिय राहिले. आणीबाणीच्या शेवटच्या काळात कुलदीप नय्यर यांना अटकही झाली होती.
1996 साली संयुक्त राष्ट्र संघात ते भारतीय शिष्टमंडळाचे ते सदस्य होते. 1990 मध्ये ग्रेट ब्रिटनमधील उच्चायुक्तलयात त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर 1997 साली राज्यसभा खासदारपदीही त्यांची निवड झाली.
'बिटविन द लाईन्स', ‘डिस्टेन्ट नेव्हर : ए टेल ऑफ द सब कॉन्टिनेन्ट', ‘इंडिया आफ्टर नेहरु', ‘इंडिया पाकिस्तन रिलेशनशिप’, ‘इंडिया हाऊस', ‘स्कूप', ‘द डे लुक्स ओल्ड' इत्यादी पुस्तके कुलदीप नय्यर यांनी लिहिली.
भारत-पाकिस्तानात शांततेसाठी प्रयत्न
कुलदीप नय्यर यांजा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात झाला. तेव्हा भारत-पाकिस्तान वेगळे नव्हते. त्यामुळे त्यांना फाळणीचं दु:ख होतंच. दोन्ही देशांबद्दल आत्मियता नय्यर यांना होती. दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, म्हणून त्यांची जीव तुटत असे. 2000 सालापासून दरवर्षी कुलदीप नय्यर हे भारत (15 ऑगस्ट) आणि पाकिस्तानच्या (14 ऑगस्ट) स्वातंत्र्य दिनी वाघा-अटारी सीमेवर मेणबत्त्या पेटवून शांतता प्रस्थापित करण्याचा संदेश देत. भारतातील पाकिस्तानी कैद्यांना आणि पाकिस्तानातील भारतीय कैद्यांना सोडवण्यासाठीही त्यांनी अनेक प्रयत्न केले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement