एक्स्प्लोर
देशाचे तेरावे उपराष्ट्रपती म्हणून व्यंकय्या नायडू शपथबद्ध
व्यंकय्या नायडू हे आंध्र प्रदेशातून उपराष्ट्रपती बनणारे तिसरे व्यक्ती आहेत. नायडूंच्या आधी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि व्हीव्ही गिरी यांनी देखील देशाचं उपराष्ट्रपतीपद भूषवलं आहे.
नवी दिल्ली : व्यंकय्या नायडू यांनी आज देशाचे तेरावे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नायडूंना शपथ आणि गोपनियतेची शपथ दिली. व्यंकय्या नायडू यांनी हिंदी भाषेत शपथ घेतली.
राष्ट्रपती भवनात आज सकाळी दहा वाजता व्यंकय्या नायडू यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सरकारमधील अनेक मोठे नेते, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, खासदार, विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते.
उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्यापूर्वी नायडू यांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीवर पुष्प वाहून आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती बनण्यासोबतच वंकय्या नायडू हे संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे अर्थात राज्यसभेचे सभापती बनले आहेत.
व्यंकय्या नायडूंनी आंध्र प्रदेशच्या नेल्लूरपासून नवी दिल्ली असा मोठा राजकीय प्रवास केला आहे. नायडूंनी आज देशाच्या दुसऱ्या मोठ्या घटनात्मक पदाची जबाबदारी स्वीकारली आहे.
दरम्यान, उपराष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानासाठी 14 खासदारांनी दांडी मारली. त्यामुळे 785 पैकी 771 खासदारांनीच मतदान केलं. एनडीएचे उमेदवार वंकय्या नायडू यांना 516 मतं मिळाली. तर त्यांचे विरोधी उमेदवार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळ कृष्ण गांधी यांना केवळ 244 मतं मिळाली.
व्यंकय्या नायडू हे आंध्र प्रदेशातून उपराष्ट्रपती बनणारे तिसरे व्यक्ती आहेत. नायडूंच्या आधी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि व्हीव्ही गिरी यांनी देखील देशाचं उपराष्ट्रपतीपद भूषवलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बॉलीवूड
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement