एक्स्प्लोर
पाचगणी आणि वेंगुर्ल्याला स्वच्छतेसाठीचा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार
महाराष्ट्रातील पाचगणी आणि वेंगुर्ला या शहरांनी स्वच्छतेसाठीचा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार पटकावला आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील पाचगणी आणि वेंगुर्ला या शहरांनी स्वच्छतेसाठीचा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार पटकावला आहे. राज्यातील या दोन शहरांनी स्वच्छतेसाठी परिश्रम घेत विशेष कामगिरीच्या जोरावर सीएसई मानांकनामध्ये अव्वल स्थान मिळवलं आहे. त्यामुळे देशपातळीवर या गावांचा नावलौकिक वाढला आहे. देशातील दहा लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला शहर अव्वल ठरलं आहे. तर पाचगणीने फोर लीव्हज मानांकनासह दुसरा क्रमांक पटकावला आहे. वेंगुर्ल्याला फाईव्ह लीव्हज पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. सेंटर फॉर सायन्स या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेने नुकतीच 2017-18 सालासाठीची मानांकनं घोषित केली. महाराष्ट्रातील या दोनही शहरांना अव्वल स्थान दिलं आहे. ‘सिटीज् दॅट सेग्रिगेट’ या मोहिमेअंतर्गत देशभरातील घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या 26 शहरांपैकी 28 शहरांचे मूल्यांकन यावेळी केलं गेलंय.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
कोल्हापूर
राजकारण
राजकारण























