एक्स्प्लोर
महिलांसाठी आरोग्यमंत्र्यांकडून वेलवेट कंडोम लॉन्च

नवी दिल्ली : भारतात पूर्णपणे स्वदेशी बनावटीचं महिलांसाठी वेलवेट कंडोम तयार करण्यात आलं आहे. एचएलएल लाईफकेअर लिमिटेड कंपनीने तयार केलेल्या या वेलेवट ब्रँडच्या कंडोमचं दिल्लीत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी लॉन्चिंग केलं. राजधानी दिल्लीत दोन दिवसीय राष्ट्रीय कुटुंब नियोजन शिखर संमोलनात या कंडोमचं लॉन्चिंग करण्यात आलं. जे. पी. नड्डा या कार्यक्रमात म्हणाले, “महिलांना हे कंडोम पूर्णपणे सुरक्षा देईल. शिवाय, महिलांना सुरक्षित लैंगिक संबंधांसाठी नियंत्रणही प्रदान करेल. महिलांचं कंडोम महिलांना सशक्त बनवण्यास उपयुक्त ठरेल. या कंडोममुळे एचआयव्ही/एड्ससारख्या रोगांनाही लगाम लागेल.” एचएलएलच्या वेलवेट ब्रँडच्या महिला कंडोमला जागतिक आरोग्य संघटनेनेही मान्यता दिली आहे. गर्भधारणा आणि संक्रमणाच्या दृष्टीने सुरक्षित असं हे कंडोम आहे. प्रभाव आणि विश्वासार्हता या दोन्हींमध्ये पुरुषांच्या कंडोम इतकंच साम्य आहे. केरळच्या तिरुअनंतपुरमस्थित एचएलएल कंपनीने हे स्वदेशी कंडोम विकसित केलं आहे. 2016 मार्चमध्ये जागतिक आरोग्य संघटना आणि यूएनएफपीएने या कंडोमला मान्यता दिली आहे. वेलवेट कंडोमचे वैशिष्ट्ये :
- हे कंडोम पूर्णपणे भारतात तयार केलेलं आहे.
- एचएलएल लिमिटेड या भारतीय कंपनीची निर्मिती
- जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता या वेलवेट कंडोमला मिळाली आहे.
- गर्भधारणेवर नियंत्रणासाठी महत्त्वाचं
- दरवर्षी अडीच कोटी कंडोम तयार करण्याचं कंपनीचं लक्ष्य
आणखी वाचा























