एक्स्प्लोर
वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर!

कटरा (जम्मू-काश्मीर): वैष्णोदेवीला जाणाऱ्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कटराहून अर्धकुंवारीला जाण्यासाठी नवा मार्ग तयार करण्याचे काम सुरु आहे. हा मार्ग काही महिन्यांमध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. आधुनिक सुविधांनी तयार करण्यात येत असलेल्या या मार्गावर, तूर्तास राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशांमुळे पायी जाणाऱ्या यात्रेकरुंनाच हा मार्ग उपलब्ध असणार आहे. जुन्या यात्रेकरुंना प्रवासासाठी घोडे, खेचर आदींचा वापर करावा लागत असे. कटरापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावर कटरा रियासी मार्गावरील बिलिनी पुलाजवळ हा नवा मार्ग तयार होत आहे. या मार्गाची लांबी 7 किलोमीटरपेक्षा थोडी जास्त आहे. या नवा मार्गावरून आपत्तीच्या काळात रुग्णवाहिका नेण्याचीही व्यवस्था आहे. या नव्या मार्गाला हाय-टेक बनवण्यासाठी अनेक अत्याधुनिक उपकरणांचा वापर करण्यात आल्यामुळे सर्वप्रकारच्या सुविधा येथे उपलब्ध असणार आहेत. या नव्या मार्गावर हाय-टेक शेल्टर बनवण्यात येणार आहेत. यासाठी अनेक कंपन्यांसोबत चर्चा सुरु आहे. तसेच या शेल्टरवर सोलर पॅनेलही बसवण्यात येणार आहेत. ज्यामुळे मार्गावरील वीजेचा प्रश्न निकाली निघेल.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक























