(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vaccination For Children : 12 ते 14 वयोगटातील मुलामुलींचं आजपासून लसीकरण, काय आहेत गाईडलाईन्स, जाणून घ्या रजिस्ट्रेशन प्रक्रिया
Vaccination For Children :12 वर्ष पूर्ण ते 14 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांचं लसीकरण करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना Corbevax या लसीचे 2 डोस 28 दिवसांच्या अंतराने देण्यात येणार आहेत.
12 to 14 years Vaccination : आजपासून 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला (Corona Vaccination) सुरूवात होत आहे. 12 वर्ष पूर्ण ते 14 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांचं लसीकरण करण्यात येणार आहे. मुंबईतील 12 केंद्रांवर 2 दिवस प्रायोगिक तत्त्वावर दुपारी 12 वाजल्यापासून लसीकरण सुरु होणार आहे.. लाभार्थ्यांना Corbevax या लसीचे 2 डोस 28 दिवसांच्या अंतराने देण्यात येणार आहेत.
केंद्र सरकारकडून 12 ते 14 या वयोगटातील लहान मुलांसाठी हे लसीकरण सुरू होणार आहे. लहान मुलांना बायोलॉजिक ईएस कोर्बोवॅक्स कंपनीची लस दिली जाण्याची शक्यता आहे. एनटीएजीआयने 12 ते 14 या वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्याची शिफारस केली होती. आरोग्य मंत्रालयाकडून यासंदर्भात गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. Corbevax ही लस मुलांना दिली जाणार असून दोन डोसमध्ये 28 दिवसांचं अंतर असणार आहे. याबाबतीत गाईडलाईन्स सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्या आहेत. देशभरात 12 ते 14 वर्षातील 7.74 कोटी मुलं आहेत. यांच्या लसीकरणासाठी CoWIN अॅप वर रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. ही लस सर्वांना मोफत दिली जाणार आहे.
भारतात 12-14 वर्षांच्या मुलांना जास्त धोका?
लसीकरण सुरू होण्यापूर्वी, कोविड वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष आणि लसीकरणावरील नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप (NTAGI) यांनी सांगितले होते की, आम्ही 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू केले आहे कारण त्यांना जास्त धोका आहे. ते म्हणाले, "चीन आणि सिंगापूरमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत. प्रौढ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असले तरी कोणतीही हलगर्जीपणा धोकादायक ठरू शकतो.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीट केलं होतं की, "मुले सुरक्षित असतील तर देश सुरक्षित आहेत! ते म्हणाले की, 12 ते 13 आणि 13 ते 14 वयोगटातील मुलांचे कोविड लसीकरण 16 मार्चपासून सुरू झाले. तसेच 60 आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाला आता बूस्टर डोस मिळू शकेल. "मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, सरकारने वैज्ञानिक संस्थांशी सल्लामसलत केल्यानंतर, 16 मार्च रोजी 12 ते 13 वर्षे आणि 13 ते 14 वर्षे वयोगटातील म्हणजेच 2008, 2009 आणि 2010 मध्ये जन्मलेली मुले, त्यांच्यासाठी कोविड 19 लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नवीन वयोगटातील सुमारे 7.11 कोटी बालकांचे देखील लसीकरण करण्यात येणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- World Coronavirus : कोरोनाची नवी लाट! चीनमध्ये लॉकडाऊन, तर रशियात सर्वाधिक मृत्यू; जगभरात 6 कोटी सक्रिय रुग्ण
- Coronavirus Updates : कोरोना महामारीचा अंत जाहीर होणार? WHO कडून तज्ज्ञांसोबत चर्चा सुरू
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha