एक्स्प्लोर

Uttarkashi Accident : बोगद्याचा भाग कोसळल्याने 41 मजूर अडकले, पाईपच्या मदतीने ऑक्सिजन पुरवठा; 24 तासांनंतरही बचावकार्य सुरुच

Uttarkhand Tunnel Crash : दुर्घटनेच्या 24 तासांनंतरही अडकलेल्या 41 मजुरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत.

Uttarkashi Tunnel Collapse : ऐन दिवाळीत उत्तरकाशीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तराखंडमधील (Uttarakhand) उत्तरकाशी (Uttarkashi) शहरामध्ये निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळल्याने 41 मजूर आतमध्ये अडकले आहेत. 24 तासांनंतरही अडकलेल्या मजुरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. युद्धपातळीवर बचावकार्य राबवण्यात येत आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना पाईपच्या मदतीने ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी वॉकीटॉकीद्वारे संपर्क झाल्याची माहिती समोर आली आहे. 

24 तास उलटल्यानंतरही बचावकार्य सुरुच

पोकळीतून पडणारा ढिगारा शॉर्ट क्रिएटिंग मशीन वापरून थांबवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, पण या प्रयत्नाला यश येत नाही. सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना 24 तासांहून अधिक काळ लोटला आहे. बोगद्यात 41 कामगार अडकले आहेत. कामगारांना वाचवण्यासाठी रात्रभर बचावकार्य सुरू होते. अडकलेल्या कामगारांशी वॉकीटॉकीच्या माध्यमातून संपर्क साधला जात आहे. कामगारांनी आपण सुरक्षित असल्याचे सांगितलं आहे.

अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी ट्विट करत लिहिलं आहे की, ''SDRF, NDRF आणि राज्य प्रशासनाचे पथक उत्तरकाशीतील सिल्क्यराजवळ बोगद्याच्या बांधकामादरम्यान झालेल्या दुर्घटनेत अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करत आहेत.'' त्यांनी स्वतः बचाव कार्यावर सतत लक्ष ठेवल्याची माहिती दिली आहे.

पंतप्रधानांनी फोनवरून घेतली माहिती

हिमाचल प्रदेशातील लेपचा येथून परत येताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  उत्तरकाशीच्या सिल्क्यराजवळ बोगद्याच्या बांधकामादरम्यान आलेल्या ढिगाऱ्यांमुळे बोगद्यात अडकलेल्या मजुरांची स्थिती, मदत आणि बचावकार्य याबाबत फोनद्वारे सविस्तर माहिती घेतली, असं मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितलं आहे. कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी राबविण्यात आलेल्या बचावकार्याची सविस्तर माहिती पंतप्रधानांना देण्यात आली आणि परिस्थितीची माहिती देण्यात आली, असंही त्यांनी सांगितलं आहे. पंतप्रधानांनी यासंबंधित सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. केंद्रीय एजन्सींना भारत सरकारने मदत आणि बचाव कार्यात सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी दिली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget