एक्स्प्लोर

Uttarkashi Tunnel Accident : 9 दिवसांनंतर पहिल्यांदा मजुरांनी मिळाली खिचडी, पाईपद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा; बोगद्यामध्ये अडकलेल्या 41 कामगारांची सुटका कधी?

Uttarakhand Tunnel Collapse : उत्तरकाशीमध्ये बोगदा कोसळून झालेल्या दुर्घटनेत 41 मजूर 12 नोव्हेंबरपासून अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य राबवलं जात आहे.

Uttarkashi Tunnel Accident : उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये निर्माणाधीन बोगद्यात अडकलेल्या मजुरांना सोमवारी पहिल्यांदाच अन्न पाठवण्यात आलं. नऊ दिवसानंतर पहिल्यांदाच बोगद्यामध्ये अडकलेल्या मजुरांना खिचडी पाठवण्यात आली. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. उत्तरकाशीमध्ये बोगदा कोसळून झालेल्या दुर्घटनेत 41 मजूर 12 नोव्हेंबरपासून अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य राबवलं जात आहे. आज या बचावकार्याचा दहावा दिवस आहे.

41 मजूर दहा दिवसांपासून बोगद्यात अडकले

उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे निर्माणाधीन बोगद्यात गेल्या दहा दिवसांपासून 41 मजूर अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी 200 हून अधिक लोकांची टीम 24 तास बचावकार्य करत आहे. दरम्यान, बोगद्यात अडकलेल्या कामगारांना सोमवारी पहिल्यांदा अन्न पाठवण्यात आलं आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, पहिल्यांदाच मजुरांसाठी खिचडी पाठवली आहे.

41 मजुरांची सुटका कधी?

बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी आणखी काही दिवस वेळ लागण्याची शक्यता आहे. बोगदा बांधकाम तज्ज्ञांच्या मते, सध्याची परिस्थिती पाहता कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आणखी पाच दिवस ते एक आठवडा लागू शकतो. बोगदा कोसळल्यानंतर मलबा हटवण्याच्या चुकीमुळे बचावकार्याचा वेळ वाढला आहे. 

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचं ट्विट

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्वीट करत सांगितलं आहे की, 'उत्तरकाशीतील सिल्क्यरा येथे निर्माणाधीन बोगद्यात अडकलेल्या मजुरांना पहिल्यांदा खिचडी पाठवण्यात आली आहे. ढिगाऱ्यातून 6 इंच व्यासाचा पाइप आतमध्ये टाकण्यात आला आहे. या पाईपलाईनद्वारे आवश्यकतेनुसार अन्नपदार्थ, औषधे आणि इतर वस्तू कामगारांना सहज पाठवल्या जात आहेत. केंद्रीय यंत्रणा, SDRF आणि राज्य प्रशासनाचे पथक अथक परिश्रम करत बचाव कार्यात गुंतलेले आहेत. सर्व कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर काम करत आहोत.'

जीवनावश्यक वस्तू पाठवण्याची योजना

कामगारांना जेवण मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांमध्ये दिलासादायक वातावरण आहे. मजुरांचे कुटुंबीय बोगद्याच्या बाहेर त्याच्या परतीची वाट पाहत आहेत. सिल्क्यरा येथील बोगद्यात अडकलेल्या मजुरांसाठी पाइपलाइनद्वारे औषधे, संत्री आणि ज्यूस पाठवण्यात येत आहे. याशिवाय मजुरांशी वॉकीटॉकीने संपर्क सुरु आहे. बोगद्यामध्ये चार्जर आणि बॅटरी पाठवण्याची योजना आहे. 

12 नोव्हेंबरला पहाटे 4 वाजता घडला अपघात

सिल्क्यरा बोगद्यात 12 नोव्हेंबरला पहाटे 4 वाजता हा अपघात घडला होता. बोगद्याच्या प्रवेशाच्या 200 मीटरच्या आत 60 मीटर माती खचली आणि 41 मजूर आत अडकले. 16 नोव्हेंबर रोजी बचाव कार्यादरम्यान, बोगद्यातून आणखी दगड पडले, ज्यामुळे मलबा एकूण 70 मीटरपर्यंत पसरला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune : बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU

व्हिडीओ

Tuljapur Temple Donation Issue : भक्ताची अंगठी, अडवणुकीची घंटी; मंदिर प्रशासनाचा अजब ठराव
Chandrapur Congress On Mahapalika Election : गटबाजीचा पूर 'हात'चं जाणार चंद्रपूर Special Report
Beed Girl Letter Ajit Pawar : शिकायचं की ऊसोड करायची? चिमुकलीने पत्रातून मांडली व्यथा Special Report
Politics On CM Fadnavis Davos : गुंतवणुकीचं मिशन, दावोसवरुन टशन; राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
KDMC MNS Supports Shivsena : जनतेचा कौल विसरले सत्तेसाठी 'चिकटले' Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune : बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
Embed widget