एक्स्प्लोर

Uttarakhand Glacier Collapse LIVE:आतापर्यंत 18 मृतदेह सापडले, 202 जण बेपत्ता

पाण्याची पातळी वाढल्याने तपोवनमध्ये वीज प्रकल्प वाहून गेल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये अनेकजण वाहून गेल्याची भीती वर्तवली जात आहे. प्रशासन घटनास्थळी पोहोचलं असून मदत व बचावकार्य सुरू झालं आहे.

LIVE

Uttarakhand Glacier Collapse LIVE:आतापर्यंत 18 मृतदेह सापडले, 202 जण बेपत्ता

Background

जोशीमठ : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात ग्लेशियर (हिमकडा) कोसळल्याची घटना घडली आहे. जोशीमठच्या रेणीतील ऋषीगंगा प्रोजेक्टजवळ ग्लेशियर कोसळल्याची माहिती आहे. त्यामुळे पाण्याची पातळी वाढल्याने तपोवनमध्ये वीज प्रकल्प वाहून गेल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये अनेकजण वाहून गेल्याची भीती वर्तवली जात आहे. प्रशासन घटनास्थळी पोहोचलं असून मदत व बचावकार्य सुरू झालं आहे.

तपोवन परिसरातील रेणी गावात वीज प्रकल्पाजवळ अचानक झालेल्या हिमस्खलनानंतर धौलीगंगा नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे. चामोली जिल्हाधिकाऱ्यांनी धौलीगंगा नदीच्या काठी वसलेल्या गावातील लोकांना बाहेर काढण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्हा दंडाधिकारी व पोलिस अधीक्षक घटनास्थळी रवाना झाले आहेत.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत म्हणाले की, चामोली जिल्ह्यात आपत्तीची घटना समोर आली आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांना या परिस्थितीला सामोरे जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे दुर्लक्ष करा. सरकार सर्व आवश्यक पावले उचलत आहे.

आयटीबीपीने एक निवेदन जारी केले की, रेणी गावाजवळील धौलीगंगा येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे.पाणी पातळी वाढल्याने अनेक नदीकाठची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. आयटीबीपीचे शेकडो कर्मचारी बचावासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत.

चामोली पोलिसांनी सांगितले की, तपोवन परिसरातील हिमकडा तुटल्यामुळे ऋषीगंगा वीज प्रकल्प दुर्घटनाग्रस्त झाला आहे. धौलीगंगा नदीकाठी राहणाऱ्या लोकांना शक्य तितक्या लवकर सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला जातो आहे.

13:33 PM (IST)  •  08 Feb 2021

उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, आतापर्यंत 18 मृतदेह सापडले आहेत आणि बेपत्ता लोकांची संख्या 202 आहे. बोगद्यात 80 मीटर पर्यंतचा अडथळा हटवण्यात आला आहे, मशीन्स पुढे आहेत, संध्याकाळपर्यंत काही तरी यश मिळेल अशी आशा आहे.
12:23 PM (IST)  •  08 Feb 2021

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी सांगितले की, तपोवन प्रकल्पाचे काम सुरू होते, त्यात मोठ्या संख्येने कामगार कार्यरत होते. आतापर्यंत 11 मृतदेह सापडले आहेत आणि 203 लोक बेपत्ता आहेत. मी माझ्या मुख्य सचिवांना सांगितले आहे की इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या सहाय्याने येथे उपस्थित असलेल्या ग्लेशियर फुटण्यामागील कारणे शोधली पाहिजेत. जेणेकरून भविष्यात आपण खबरदारी घेऊ शकू.
09:59 AM (IST)  •  08 Feb 2021

उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, रैनी वीज प्रकल्प पूर्णपणे वाहून गेला आहे आणि तपोवनचेही नुकसान झाले. पहिल्या प्रकल्पातून 32 लोक बेपत्ता आहेत तर दुसऱ्या प्रकल्पातून 121 लोक बेपत्ता आहेत. यापैकी 10 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
08:57 AM (IST)  •  08 Feb 2021

आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू, 170 जण बेपत्ता असल्याची माहिती, बचावकार्य सुरुच
23:36 PM (IST)  •  07 Feb 2021

उत्तराखंडमधील विध्वंसानंतर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. काही लोक अजूनही बोगद्यात अडकले आहेत. बोगदा खोदण्यासाठी एक्सावेटर आणि पोकलँड मशीन घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. रात्री देखील बचाव कार्य चालू राहण्यासाठी लाईट बसविण्यात आली आहे.
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget