एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Uttarakhand Avalanche : अजूनही काही गिर्यारोहक अडकल्याची भिती, ढगांमुळे हेलीकॉप्टर उडवण्यास अडचण, रेस्क्यू ऑपरेशन स्थगित

Uttarakhand Avalanche : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये हिमस्खलन (Avalanche) झाल्यानंतर जवळपास 28 गिर्यारोहक त्याठिकाणी होते. ज्यातील 14 जणांना वाचवण्यात यश आलं, तर 10 गिर्यारोहकांचा मृत्य झाला आहे.

Uttarakhand Avalanche : उत्तराखंडमधील (Uttarakhand) उत्तरकाशी (Uttarkashi Avalanche) येथे झालेल्या हिमस्खलनामुळे (Avalanche)  10 गिर्यारोहकांना जीव गमवावा लागला आहे. तसंच 14 गिर्यारोहकांना वाचवण्यात यश आलं असून आता मात्र ढगांमुळे हेलिकॉप्टर उडवण्यास अडचण येत असल्याने बचावकार्य थांबवण्यात आलं आहे.  सकाळी पुन्हा बचावकार्य सुरु होणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील द्रौपदी दंड-2 शिखरावर तब्बल 17000 हजार फुट उंचीवर हिमस्खलन झाल्यानंतर जवळपास 28 गिर्यारोहक अडकले होते. ज्यानंतर युद्धपातळीवर बचावकार्य सुरु होतं.  ज्याबद्दल बोलताना भटवारीचे उपविभागीय दंडाधिकारी छतर सिंग चौहान यांनी सांगितले की, बचावकार्यात वाचवण्यात आलेल्या 14 गिर्यारोहकांपैकी सहा जणांना हिमस्खलनात किरकोळ दुखापत झाली असून त्यांना हेलिकॉप्टरच्या दोन फेऱ्यानंतर वाचवण्यात आलं. या वाचवण्यात आलेल्या 14 जणांपैकी 10 प्रशिक्षणार्थी आणि चार प्रशिक्षक आहेत. पोलिसांनी जाहीर केलेल्या यादीनुसार हे प्रशिक्षणार्थी पश्चिम बंगाल, दिल्ली, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, आसाम, हरियाणा, गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमधील आहेत.   

उर्वरीत गिर्यारोहकांचा शोध सुरु 

नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF), स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (SDRF), इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) आणि NIM संयुक्तपणे शोध आणि बचाव कार्य करत होते. मंगळवारी (4 ऑक्टोबर) सकाळी 9.45 वाजता हिमस्खलन झाल्यापासून बेपत्ता गिर्यारोहकांचा शोध अजूनही सुरू आहे. बेपत्ता लोक डोकरीयानी बामक हिमनदीच्या हिमखंडात अडकले असल्याची माहिती समोर येत आहे. संबधित ठिकाण मूळचं उत्तरकाशी जिल्ह्यातील लोंथरू गाव येथील आहे. बुधवारी सकाळी शोध आणि बचाव मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर आणि चार ITBP जवान चिता आणि ALH हेलिकॉप्टरमधून डोकारियानी ग्लेशियरवर गेले. पण मंगळवारी अंधारामुळे बचावकार्य विस्कळीत झाले. आता सकाळी बचावकार्य पुन्हा सुरु होईल अशी माहिती समोर आली आहे.

गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून शोक व्यक्त

अडकलेल्या गिर्यारोहकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. काही  गिर्यारोहकांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. त्यानंतरही हिमस्खलनात काही गिर्यारोहक अडकल्याची माहिती आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हिमस्खलनात अडकलेल्या 10 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. उत्तरकाशीमध्ये हिमस्खलनाची घटना अत्यंत दुःखद आहे. यासंदर्भात मी अधिकाऱ्यांशी बोललो आहे. स्थानिक प्रशासन, SDRF, NDRF, ITBP आणि लष्कराचे पथक पूर्ण तयारीनिशी मदत आणि बचाव कार्यात गुंतले असल्याचे शाह म्हणाले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी बोलून बचाव कार्याला गती देण्यासाठी लष्कराची मदत मागितली आहे. 

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Pritisangam : प्रितीसंगम येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना शरद पवारांकडून अभिवादनTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaAnantrao Kalse : एकही आमदार नसल्यानं आणि मतांचा कमी टक्केवारीचा मनसेला फटका?Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  25 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Embed widget