UP Ram Lalla Tableau : 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील राजपथावर उत्तर प्रदेशचा चित्ररथ; अयोध्येच्या राम मंदिराने वेधलं लक्ष
UP Ram Lalla Tableau : देशाच्या 75 व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त दिल्लीतील राजपथावर विविध संस्कृतीचं, राज्याचं दर्शन घडलं. तसेच, यामध्ये मुख्य आकर्षण ठरलं ते उत्तर प्रदेशातील अयोध्या राम मंदिर.
UP Ram Lalla Tableau : आज भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2024) साजरा केला जातोय. या निमित्ताने सगळीकडे वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. राजधानी दिल्लीतील (Delhi) कर्तव्य पथावर आज या सोहळ्यानिमित्त परेड तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं.
दिल्लीतील राजपथावर उत्तर प्रदेशातील अयोध्या राम मंदिराचं दर्शन
देशाच्या 75 व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त दिल्लीतील राजपथावर विविध संस्कृतीचं, राज्याचं दर्शन घडलं. तसेच, यामध्ये मुख्य आकर्षण ठरलं ते उत्तर प्रदेशातील अयोध्या राम मंदिर. या ठिकाणी राजपथावर अयोध्या राम मंदिराचा चित्ररथ पाहायला मिळाला. या राम मंदिराने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. 'अयोध्या: विकसित भारत-सम्राध विरासत' या थीमसह हा चित्ररथ साकारण्यात आला होता जो डोळ्यांचे पारणे फेडणारा होता.
या ठिकाणी उत्तर प्रदेशसह, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, आसाम, तेलंगणा यांसारख्या अनेक राज्यांचा चित्ररथ साकारण्यात आला. राजपथावर एकाच वेळी कला, संस्कृती, परंपरा, बोलीभाषा, पेहराव यांचं अद्भूत दर्शन घडवणारा असा हा सोहळा पार पडला. या निमित्ताने प्रत्येक राज्याचं खासं वैशिष्ट्य पाहायला मिळालं.
राजपथावर विविध मान्यवरांची हजेरी
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित होते. तर, या कार्यक्रमाच्या वेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पाहायला मिळाले.
500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत भव्य राम मंदिर
22 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या अद्भूत सोहळ्याला विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली. तब्बल 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिरात प्रभू श्रीराम विधीवत विराजमान झाले. अयोध्येसह संपूर्ण देशभरात राम नामाचा जयघोष पाहायला मिळाला. नव भूतो न भविष्यती अशा अभूतपूर्व सोहळ्यात पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) हस्ते प्रभू श्रीरामाचा (Shri Ram) विधीवत अभिषेक सोहळा पार पडला. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर प्रभू श्रीरामाचं तेजस्वी रुप समोर आलं.
पाहा व्हिडीओ :
#WATCH | The #RepublicDay2024 tableau of Uttar Pradesh takes part in the parade.
— ANI (@ANI) January 26, 2024
The theme of the tableau is based on 'Ayodhya: Viksit Bharat-Samradh Virasat'. The front of the tableau symbolises the Pranpratishtha ceremony of Ram Lalla, showcasing his childhood form. pic.twitter.com/VHdsaiVMvo
महत्त्वाच्या बातम्या :