एक्स्प्लोर

G20 Summit India : G20 परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आज भारतात दाखल होणार, महत्त्वांच्या विषयावर होणार चर्चा

G20 शिखर परिषदेसाठी (G20 Summit India) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन  (US President Joe Biden) आज भारतात दाखल होणार आहेत.

G20 Summit India :  G20 शिखर परिषदेसाठी (G20 Summit India) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन  (US President Joe Biden) आज भारतात दाखल होणार आहेत. ते अमेरिकेतून भारतात येण्यासाठी रवाना झाले आहेत. बायडन यांची कोरोन टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळं त्यांच्या येण्याबाबत स्पष्टता नव्हती.मात्र, त्यानंतरचे बायडन यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने बायडन G 20 साठी भारतात दाखल होत आहेत. या परिषदेत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे. नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद होणार आहे. 

बायडन यांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था

बायडन यांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तो दिल्लीतील आयटीसी मौर्या हॉटेलमध्ये राहणार आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिडेन हे त्यांच्या खास विमान एअर फोर्स वनने येथे पोहोचत आहेत. त्याच्यासोबत अमेरिकन गुप्तचर विभागाचे सुरक्षा कर्मचारी आणि वाहनांचा संपूर्ण ताफाही भारतात पोहोचत आहे.

महत्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार

अमेरिकेचे अध्यक्ष बायडन हेदेखील G-20 शिखर परिषदेसाठी उत्सुक होते. कारण या परिषदेत ते महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये हवामान बदल आणि जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यासारख्या मुद्यांवर चर्चा होमार आहे. तसेच या G-20 परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्यात द्विपक्षीय बैठक होण्याची अपेक्षा होती. दोन्ही नेते GE फायटर जेट इंजिन करारावर चर्चा करणार होते. या कराराला अमेरिकेच्या संसदेने नुकतीच मंजुरी दिली होती. त्याशिवाय, लहान आकाराच्या अणुभट्ट्या, व्हिसा प्रक्रिया अधिक सुलभ करण्याबाबतही चर्चा होणार होती. 

जी-20 परिषदेसाठी 'या' देशांचे प्रमुख हजर राहणार?

जी-20 परिषदेसाठी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, चीनचे पंतप्रधान ली कियांग आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे नवी दिल्लीत उपस्थित राहणार आहेत. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी भारत दौऱ्यावरून माघार घेतल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) हे देखील भारत दौऱ्यात उपस्थित राहणार का? याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते.  मात्र,  G20 शिखर परिषदेसाठी (G20 Summit India) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन  (US President Joe Biden) आज भारतात दाखल होणार आहेत. ते अमेरिकेतून भारतात येण्यासाठी रवाना झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

G-20 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या भारत दौऱ्यावर अनिश्चितता; जी-20 परिषदेसाठी आहे नियोजित दौरा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget