एक्स्प्लोर
Advertisement
यूपीएससी परीक्षेत देशात महिलांमध्ये अव्वल मराठमोळ्या सृष्टी देशमुखचा कानमंत्र
भोपाळमध्ये राहणारी सृष्टी देशमुख रोज अभ्यास सुरु असतानाच ऑनलाईन टेस्ट सीरिजच्या माध्यमातून स्वतःला तपासून पाहत होती. भोपाळसोबतच दिल्लीमधल्या चांगल्या शिक्षकांचं मार्गदर्शन लाभल्याचंही सृष्टी सांगते.
भोपाळ : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा अर्थात यूपीएससी 2018 परीक्षेत मराठमोळ्या सृष्टी देशमुखने महिलांमध्ये अव्वल येण्याचा मान पटकावला आहे. भोपाळमध्ये राहणाऱ्या सृष्टीने देशात पाचवा क्रमांक पटकावला. लहानपणापासून पाहिलेलं स्वप्न तिने पहिल्याच प्रयत्नात पूर्ण केलं.
सिक्युअर करिअर म्हणून सृष्टीने सुरुवातीला इंजिनिअरिंग केलं. मात्र नागरी सेवा तिला खुणावत होत्या. लहानपणापासून कलेक्टर होण्याचं स्वप्न पाहिलेल्या सृष्टी देशमुखने त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले. विशेष म्हणजेच पहिल्याच प्रयत्नात तिने यशाला गवसणी घातली आहे. टॉप दहामध्ये येण्याचं ठरवलं होतं, असंही सृष्टी म्हणते.
यूपीएससी परीक्षेत निवृत्त परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांची कन्या पूजा मुळे देशात अकरावी
रोज अभ्यास सुरु असतानाच ऑनलाईन टेस्ट सीरिजच्या माध्यमातून ती स्वतःला तपासून पाहत होती. भोपाळसोबतच दिल्लीमधल्या चांगल्या शिक्षकांचं मार्गदर्शन लाभल्याचंही सृष्टी सांगते. यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना सृष्टीला दोन वैशिष्ट्यं जाणवली. एक तर तुम्ही यशस्वी होऊन नागरी सेवेची वाट चोखंदळता. पण दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला प्रेरणा देणं. लवकर उठायचं आणि अभ्यासाला बसायचं, कधी तुम्ही एकटेच अभ्यास करत असता, बराचसा वेळ घरातच जातो. लग्न सोहळ्यांना हजेरी लावता येत नाही, सोशल मीडियापासून दूर, मात्र हे मोटिवेशन तुम्हाला यशाच्या दिशेने नेतं, असं तिला वाटतं. VIDEO | यूपीएससी परीक्षेत देशात महिलांमध्ये अव्वल मराठमोळ्या सृष्टी देशमुखशी बातचित समाजासाठी काही करायचं असेल, तर तीन मार्ग आहेत. पहिला राजकारण. निवडणुकीला उभे राहा. तिसरा म्हणजे सामाजिक कार्याचा. पण मी त्याचा सुवर्णमध्य निवडला. दुसरा मार्ग- सिव्हील सर्व्हिसेसचा. तुम्ही यंत्रणेचा भाग असता. तुमच्याकडे निर्णयक्षमता असतात, असंही सृष्टी म्हणाली.UPSC निकाल : पालघरमधील शेतकऱ्याच्या लेकाचा देशात डंका, हेमंता पाटील 39 वा
सृष्टीच्या यशाबद्दल तिच्या कुटुंबीयांनाही अपार आनंद झाला आहे. ही लेकीची मेहनत असल्याचं तिचे वडील अभिमानाने सांगतात. आईने आपल्या खाण्या-पिण्याच्या वेळा सांभाळल्या. सतत पौष्टिक आहार दिला आणि योगा-मेडिटेशन करुन घेतलं, असं सृष्टी म्हणाली. यूपीएससी परीक्षेत कनिष्क कटारिया देशात पहिला आला. पहिल्या पन्नासमध्ये पाच मराठमोळे विद्यार्थी आहेत. सृष्टी देशमुख (पाचवी), तृप्ती धोडमिसे (16 वी), वैभव गोंदणे - (25 वा), मनिषा आव्हाळे - (33 वी), हेमंत पाटील - (39 वा) अशी त्यांची क्रमवारी आहेअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement