एक्स्प्लोर

Accident News : नाचता-नाचता वरात पुढे चालली, नवरदेव उलटी आली म्हणून रस्त्याच्या कडेला गेला अन् घात झाला...दोन्ही कुटुंबाच्या आनंदावर विरजण, लग्नघरात पसरली स्मशानशांतता

Accident News : उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये, लग्न समारंभावेळी झालेल्या अपघातात वराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने लग्नघरी असलेल्या आनंदावर क्षणात विरजण पडलं.

Accident News :  उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात झालेल्या एका दुःखद घटनेने लग्नघरी असलेल्या आंनदावरती क्षणात विरजण पडलं. लग्न समारंभाच्या काही वेळ आधी झालेल्या अपघातात (Accident News) वराचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामुळे घटनास्थळी गोंधळ उडाला. पोलिसांनी वराचा मृतदेह (Accident News) ताब्यात घेतला आहे आणि तपास सुरू केला आहे. अपघातस्थळावरून पळून गेलेल्या ट्रक चालकाचाही शोध सुरू आहे. या मिळालेल्या वृत्तानुसार, रविवारी रात्री बिनौली येथील रहिवासी सुबोध (२५) याला सरुरपूर कलन गावात लग्न समारंभाच्या आधी ट्रकने धडक दिली आणि या घटनेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात झाला तेव्हा तो दिल्ली-सहारापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला उभा होता आणि उलट्या करत होता. त्याला धडक दिल्यानंतर चालक ट्रक घेऊन पळून गेला.(Accident News)

Accident News :  रस्त्याच्या कडेला उभा राहून तो उलट्या करू लागला

बिनौली गावातील फिजिओथेरपिस्ट सुबोधची लग्नाची मिरवणूक रविवारी सरूरपूर कलान गावात आली. लग्नाच्या स्वागत समारंभ आणि नाश्त्यानंतर पुढील विधी होणार होते. पण विवाहस्थळी पोहचण्याआधी सुबोधला अस्वस्थ वाटू लागले आणि रस्त्याच्या कडेला उभा राहून तो उलट्या करू लागला. दिल्लीहून येणाऱ्या एका ट्रकने सुबोधला जोरदार धडक दिली. धडकेमुळे सुबोध जमिनीवर पडला. लग्नाच्या वेळी त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्याचवेळी त्याचा मृत्यू झाला.

Accident News : अनेकांना सुबोधच्या मृत्यूची माहिती नव्हती

लग्नाच्या वरातीत पाहुणे मंडळी, मित्र परिवार आनंदाने नाचत राहिले. सुबोधच्या लग्नाची तयारी सुरू होती आणि लग्नाची पार्टीही सुरू होती. वधूच्या घरीही आनंदोत्सव साजरा होत होता. या दुर्घटनेची बातमी पसरताच दोन्ही घरांवर शोककळा पसरली. रुग्णालयात आलेल्या अनेक लग्नाच्या पाहुण्यांनी सांगितले की अनेकांना सुबोधच्या मृत्यूची माहिती नव्हती आणि ते सर्वजण लग्नाचा आनंद साजरा करत होते. ज्यांना सुरुवातीला मृत्यूबद्दल सांगण्यात आले त्यांना विश्वास बसला नाही. माहिती मिळताच पोलिसांनी घटनेचा तपास केला. तपास अधिकारी दीक्षित त्यागी यांच्या मते, धडक देणारा ट्रक शोधण्यासाठी आणि त्याला पकडण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

Accident News : भरधाव वेगात आलेल्या ट्रकने सुबोधला चिरडले

या अपघातातबाबत नवरदेवाच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, सुबोधला मळमळत असल्याने तो रस्त्याच्या कडेला गेला. उलट्या होऊ लागल्याने तो गाडीजवळ उभा असतानाच विरुद्ध दिशेने भरधाव वेगात आलेल्या ट्रकने सुबोधला चिरडले. त्यानंतर ट्रकने त्याला काही मीटर अंतरापर्यंत फरफटत ओढून नेले. पुढे ट्रक चालक त्याला तसाच टाकून पळून गेला. पाहुण्यांनी त्याला तातडीने एका खाजगी रुग्णालयात नेले आणि नंतर त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला

Embed widget