एक्स्प्लोर

State Women Commission: पुरुष टेलर घेऊ शकणार नाही महिलांचं माप, ना केस कापू शकणार ना जीम ट्रेनिंग देऊ शकणार; या राज्याच्या महिला आयोगाचा प्रस्ताव

State Women Commission: उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाने महिलांना ‘बॅड टच’पासून संरक्षण देण्यासाठी आणि पुरुषांचे वाईट वर्तणूक टाळण्यासाठी एक प्रस्ताव दिला आहे.

State Women Commission: उत्तर प्रदेशमधील महिला आयोगाने दिलेला प्रस्ताव मान्य झाल्यास उत्तर प्रदेशात महिलाच्या कपड्यांचे माप पुरुष टेलर घेऊ शकणार नाहीत. पुरुषांना महिलांचे केस देखील कापता येणार नाहीत. पुरूषांचे वाईट हेतू आणि चुकीच्या स्पर्शापासून महिलांचे रक्षण करण्यासाठी राज्य महिला आयोगाने याबाबतचा प्रस्ताव दिला आहे. गेल्या महिन्यात महिला आयोगाची बैठक झाली होती. त्यात यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. या प्रस्तावांवर राज्य सरकारने कायदा मंजूर करावा, अशी विनंती आम्ही करू, असे आयोगाच्या सदस्य हिमानी अग्रवाल यांनी सांगितले.

उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाने महिलांना ‘बॅड टच’पासून संरक्षण देण्यासाठी आणि पुरुषांचे वाईट हेतू थांबवण्यासाठी एक प्रस्ताव दिला आहे. यानुसार पुरुषांनी (मेल टेलर) महिलांचे कपडे शिवू नयेत किंवा केस कापू नयेत. हा प्रस्ताव राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा बबिता चौहान यांनी मांडला, त्याला बैठकीत उपस्थित इतर सदस्यांनी पाठिंबा दिला आहे. 28 ऑक्टोबर रोजी झालेल्या महिला आयोगाच्या बैठकीनंतर अशा अनेक सूचना करण्यात आल्या, ज्यात पुरुषांना महिलांचे माप घेऊ न देणे, दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आदींचा यामध्ये समावेश होता. सध्या हा केवळ प्रस्ताव असून महिला आयोग यासंदर्भात कायदा करण्याची विनंती नंतर राज्य सरकारला करणार आहे. महिला आयोगाचे नियम पाळले जातील याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असेल.

या संदर्भात यूपी महिला आयोगाच्या सदस्य हिमानी अग्रवाल यांनी शुक्रवारी बोलताना सांगितले, नुकत्याच झालेल्या महिला आयोगाच्या बैठकीत महिलांनी परिधान केलेल्या कपड्यांचे माप फक्त महिला टेलरने घ्यावे असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. तसेच दुकानात सीसीटीव्ही बसवावेत, अशी मागणी देखील करण्यात आली होती.

हिमानी अग्रवाल यांच्या माहितीनुसार, सलूनमध्ये फक्त महिला कर्मचाऱ्यांनी महिला ग्राहकांची काळजी घ्यावी. कारण, या प्रकारच्या व्यवसायात असलेल्या पुरुषांमुळे महिलांचा विनयभंग होतो, असे आमचे मत आहे. पुरुष गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करतात. काही पुरुषांचे हेतूही चांगले नसतात. मात्र, सर्वच पुरुषांचे हेतू वाईट असतात असे नाही, असेही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

काय म्हणाल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा?

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा बबिता चौहान म्हणाल्या की, महिला ज्या जिममध्ये जातात, तेथे महिला प्रशिक्षक असायला हवेत. सर्व जिम ट्रेनर्सची पोलीस पडताळणी करावी. जर एखाद्या महिलेला पुरुष प्रशिक्षकाकडून प्रशिक्षण घ्यायचे असेल तर तिला ते लेखी द्यावे लागेल. 

जिममध्ये जाणाऱ्या महिला आणि मुलींच्या शोषणाच्या तक्रारी महिला आयोगाकडे सातत्याने येत असून, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, ज्या दुकानात महिलांचे कपडे शिवले जातात, तेथे माप घेण्यासाठी महिला टेलरची नियुक्ती केली आहे. याची खात्री करावी. इतकेच नाही तर ज्या स्कूल बसमध्ये मुली प्रवास करतात त्या बसमध्ये महिला कर्मचारी असाव्यात. सध्या महिला आयोगाने सर्व जिल्ह्यांना याबाबतचे आदेश दिले आहेत. जो मान्य करणार नाही त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vaishnavi Hagavne Case: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
Abhishek Sharma: टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
Bombay High court on Palash Muchchal Case: पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?
पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?
खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ताला अमेरिकेत 24 वर्षांची शिक्षा
खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ताला अमेरिकेत 24 वर्षांची शिक्षा

व्हिडीओ

Ganesh Naik :चांगलं काम केलं नाही तर मंत्रिपद चाटायचं का? नगरविकास खात्यातील लोकांचं कर्मदरिद्री काम
Sanjay Raut on Sharad Pawar: शरद पवार पुन्हा राज्यसभा लढणार, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Vaishnavi Hagavane Case :वैष्णवी हगवणे प्रकरणात सहा जणांवर आरोप निश्चित
Sunetra Pawar Janta Darbar : उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवारांचा आज बारामतीत पहिला जनता दरबार
Buldhana Bus Driver Drunk : मद्यधुंद बस चालकांचा खामगाव बसस्थानकात धिंगाणा!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaishnavi Hagavne Case: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
Abhishek Sharma: टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
Bombay High court on Palash Muchchal Case: पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?
पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?
खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ताला अमेरिकेत 24 वर्षांची शिक्षा
खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ताला अमेरिकेत 24 वर्षांची शिक्षा
Sanjay Raut: अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे अमित शाहांच्या हातात, प्रफुल पटेल शाह सांगतात तेच बोलतात, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार नाही: संजय राऊत
प्रफुल पटेल अमित शाहांना हवं तेच बोलतात, राष्ट्रवादी काँग्रेसचा कंट्रोल अमित शाहांकडे: संजय राऊत
Police Recruitment Beed News: बीडमध्ये बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर, MBA, MCA झालेले उच्चशिक्षित तरुण पोलीस भरतीसाठी मैदानात उतरले
बीडमध्ये बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर, MBA, MCA झालेले उच्चशिक्षित तरुण पोलीस भरतीसाठी मैदानात उतरले
Nashik News: पतीला मृत्यूच्या दाढेतून खेचून बाहेर काढलं, पण विजेच्या धक्क्याने पत्नीचा दुर्दैवी अंत; नाशिकमधील हृदयद्रावक घटना
पतीला मृत्यूच्या दाढेतून खेचून बाहेर काढलं, पण विजेच्या धक्क्याने पत्नीचा दुर्दैवी अंत; नाशिकमधील हृदयद्रावक घटना
Hardik Pandya News : BCCI च्या पॉलिसीला हार्दिक पांड्याने दाखवला कात्रजचा घाट, गर्लफ्रेंडसोबतचा तो Video व्हायरल अन् क्रिकेट विश्वात खळबळ
BCCI च्या पॉलिसीला हार्दिक पांड्याने दाखवला कात्रजचा घाट, गर्लफ्रेंडसोबतचा तो Video व्हायरल अन् क्रिकेट विश्वात खळबळ
Embed widget