एक्स्प्लोर
मायावतींवर असंसदीय भाषेत टीका केलेल्या भाजप नेत्याचं निलंबन मागे

लखनऊ : बसपा अध्यक्षा मायावती यांच्या विषयी अपशब्द वापरल्याने निलंबन करण्यात आलेल्या भाजप नेत्याचं निलंबन मागे घेतलं आहे. भाजपचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष केशव प्रसाद मौर्य यांनी दयाशंकर सिंह यांचं निलंबन मागे घेत पुन्हा पक्षात स्थान दिलं. दयाशंकर सिंह यांनी उत्तर प्रदेश भाजपच्या उपाध्यक्ष पदावरही काम केलेलं आहे. शिवाय त्यांच्या स्वाती सिंह लखनऊतील सरोजनी नगर येथून भाजपच्या तिकीटावर निवडूनही आल्या आहेत. काय आहे प्रकरण? दयाशंकर सिंह यांनी मायावतींवर गंभीर आरोप केले होते. मायावती यांनी काशीराम यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केलीय. मायावती पैसे देऊन तिकीटाची विक्री करतात. असं म्हणत दयाशंकर यांनी असंसदीय शब्दात टीका केली होती. या वक्तव्यानंतर बसपा कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. दयाशंकर सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपने त्यांचं निलंबन केलं होतं.
संबंधित बातम्या :
मायावतींवर शेरेबाजी करणाऱ्या दयाशंकर सिंह यांना अटक
आणखी वाचा























