एक्स्प्लोर

UP Assembly Election Result 2017: उत्तर प्रदेशचा निकाल

लखनऊ: देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. 403 जागांच्या विधानसभेत भारतीय जनता पक्षाने एकहाती विजय मिळवत तब्बल 325  जागा जिंकल्या. उत्तर प्रदेशात सत्ता स्थापनेसाठी 202 जागांची गरज आहे. मात्र भाजपने त्यापुढे मजल मारुन तब्बल 305 जागी विजय मिळवला. यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये 1991 मध्ये राम मंदिराच्या आंदोलन काळात  झालेल्या निवडणुकीत भाजपला 221 जागा मिळाल्या होत्या.  यंदा भाजपने त्यापुढे मोठी झेप घेत तब्बल 300 चा आकडा ओलांडला आहे. उत्तर प्रदेशात कोणत्या पक्षाला किती जागा? भाजप - 312+( अपना दल 9, सुहेलदेव भारतीय समाज पार्टी 4) = 325  समाजवादी पक्ष - 47 काँग्रेस - 7 बसपा - 19 राष्ट्रीय लोक दल - 1 इतर -04
राम मंदिर लाटेपेक्षाही मोदी लाट मोठी, भाजप स्वत:चाच रेकॉर्ड मोडणार!
राम मंदिराच्या आंदोलनानंतर 1991 मध्ये  उत्तर प्रदेशमध्ये  झालेल्या निवडणुकीत भाजपला 221 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे राम मंदिर लाटेपेक्षाही इथं मोदी लाट मोठी असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे भाजप उत्तरप्रदेशमध्ये आपला स्वत:चाच रेकॉर्ड मोडणार असं चित्र दिसतं आहे. आजवर भाजपला उत्तरप्रदेशात विधानसभेत एवढ्या जागा कधीच मिळाल्या नव्हत्या. 1991 साली भाजपनं 221, काँग्रेसनं 46, जनता दलनं 92, जनता पार्टीनं 34 आणि बसपनं 12 जागा मिळवल्या होत्या. EVM घोटाळा करुन भाजपचा विजय, निकाल रद्द करुन फेरमतदान घ्या : मायावती दरम्यान, बसपा अध्यक्ष मायावती यांनी या निवडणूक प्रक्रियेवरच आक्षेप घेत, मतमोजणी थांबवून पुन्हा मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी केली आहे. इतकंच नाही तर भाजपने मतदान यंत्रात घोळ करुन विजय मिळवल्याचा गंभीर आरोपही मायावतींनी केला. त्यामुळे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील मतमोजणी थांबवून, हा निकाल रद्द करा अशी मागणी मायावतींनी केली. मुस्लिमबहुल भागातही कमळ उत्तर प्रदेशात मोदी लाट कायम पाहायला मिळाली. यापूर्वी मुस्लिमबहुल भागात कुठेही भाजपला जागा मिळत नव्हती, मात्र यावेळी देवबंद, दादरी, अलिगड आणि कैराना या भागात भाजपचं कमळ फुललं. महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण उत्तर प्रदेशात भाजपने एकही मुस्लिम उमेदवार दिला नव्हता, तरीही याठिकाणी भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. "मुस्लिम भागात भाजपचं काहीही अस्तित्व नव्हतं, त्यामुळे भाजपने इथे विजय कसा मिळवला", असा आक्षेप मायावतींनी घेतला होता.

भाजपने उत्तर प्रदेशचं युद्ध कसं जिंकलं? 10 कारणे

पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

मी उत्तर प्रदेशच्या जनतेला धन्यवाद देतो. भाजपचा हा विजय विकास आणि सुशासनाचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी दिली. याशिवाय काशीचा खासदार म्हणून काशीच्या जनतेने विश्वास आणि अपार प्रेम दिल्याबद्दल नमन, असंही मोदी म्हणाले. राहुल गांधींची प्रतिक्रिया उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निकालानंतर राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील विजयाबद्दल पंतप्रधान मोदी आणि भाजपचं अभिनंदन असं राहुल गांधी म्हणाले.

मोदींच्या ट्वीटला लालूप्रसाद यादव यांचं उत्तर !

उत्तर प्रदेशच्या निकालाची वैशिष्ट्ये 1.यूपीमध्ये सरोजिनीनगर मतदार संघातून स्वाती सिंह विजयी. या भाजपचे नेते दयाशंकर सिंह यांच्या पत्नी. दयाशंकर मायावतींबद्ल अपशब्दांमुळे वादात, पक्षानं त्यांना बाजूला करून स्वाती सिंह यांना तिकीट दिलं होतं. २. सपा नेते राजा भैय्या हे कुंडा मतदारसंघातून तब्बल १ लाख मतांनी विजयी झाले, मोदींच्या एवढया लाटेतही राजा भैय्यांचं संस्थान कायम ३. रीटा बहुगुणा जोशी या काँग्रेसमधून नुकत्याच भाजपमध्ये आल्या होत्या. बहुगुणा लखनऊ कँन्टोनमेंट मतदारसंघातून विजयी, त्यांनी अखिलेशची वहिनी अपर्णा यादव यांना पराभूत केलं. ही सीट सर्वात गाजलेली होती. ४. शिवपालसिंह यादव जसवंतनगरमधून विजयी झालेत. कौटुंबिक संघर्षात त्यांना काही दगाफटका होणार का याची चर्चा होती. ५. मथुरा मतदारसंघातून श्रीकांत शर्मा हे भाजपचे युवा नेते जिंकलेत. पक्षाच्या दिल्ली मुख्यालयात मीडिया प्रमुख म्हणून ते जबाबदारी सांभाळत होते

2019 विसरा आणि 2024 च्या तयारीला लागा : अब्दुल्ला

संबंधित बातम्या GOA Assembly Election Result 2017: गोवा निवडणूक निकाल
गोव्यात सर्वाधिक मतदारांची नोटाला पसंती
चार राज्यात भाजपचं सरकार, उद्या मुख्यमंत्री ठरवू : अमित शाह
EVM घोटाळा करुन भाजपचा विजय, निकाल रद्द करुन फेरमतदान घ्या : मायावती
विजयाबद्दल पंतप्रधान मोदी आणि भाजपचं अभिनंदन : राहुल गांधी
UP Assembly Election Result 2017: उत्तर प्रदेशचा निकाल
Punjab Assembly Election Result 2017: पंजाबचा निकाल
Uttarakhand Assembly Election Result 2017 : उत्तराखंडचा निकाल
Manipur Assembly Election Result 2017: मणिपूरचा निकाल लाईव्ह
Assembly Election Result 2017 : पाच राज्यांत कोणाची सत्ता?

उत्तर प्रदेश निकाल लाईव्ह अपडेट

  • उत्तर प्रदेश (403/403) -भाजप 322, सपा+काँग्रेस 57, बसपा 18, इतर 6
  • भाजप 314, सपा+काँग्रेस 66, बसपा 17, इतर 6
  • भाजप 311, सपा+काँग्रेस 66, बसपा 19, इतर 7
  • भाजप 306, सपा+काँग्रेस 70, बसपा 20, इतर 7
  • उत्तर प्रदेश (403/403) - भाजप 311, सपा+काँग्रेस 64, बसपा 20, इतर 8
  • उत्तर प्रदेश (403/403) - भाजप 303, सपा+काँग्रेस 69, बसपा 23, इतर 7
  • उत्तर प्रदेश (403/403) - भाजप 302, सपा+काँग्रेस 71, बसपा 20, इतर 10
  • उत्तर प्रदेश (403/403) - भाजप 295, सपा+काँग्रेस 74, बसपा 25, इतर 9
  • भाजप 285, सपा+काँग्रेस 74, बसपा 27, इतर 10
  • भाजप 276, सपा+काँग्रेस 72, बसपा 27, इतर 12
  • यूपीत यादवबहुल भागात 60 पैकी 33 जागी भाजप आघाडीवर
  • भाजप 260, सपा+काँग्रेस 70, बसपा 27, इतर 12
  • भाजप 250, सपा+काँग्रेस 68, बसपा 31, इतर 10
  • भाजप 245, सपा+काँग्रेस 68, बसपा 31, इतर 10
  • BJP ला 1991 नंतर पहिल्यांदाच यूपी निवडणुकीत इतकी मोठी आघाडी, भाजप 240 जागांवर आघाडीवर
  • भाजप 236, सपा+काँग्रेस 64, बसपा 33, इतर 10
  • भाजप 230, सपा+काँग्रेस 64, बसपा 35, इतर 10
  • भाजप 209, सपा+काँग्रेस 60, बसपा 35, इतर 12
  • उत्तर प्रदेशात भाजपची घोडदौड, आतापर्यंतच्या कलात भाजपला बहुमत, 205 जागांवर आघाडी
  • भाजप 187, सपा+काँग्रेस 40, बसपा 26, इतर 11
  • भाजप 160, सपा+काँग्रेस 47, बसपा 30, इतर 8
  • भाजप 140, सपा+काँग्रेस 44, बसपा 28, इतर 7
  • भाजप 125, सपा+काँग्रेस 37, बसपा 25, इतर 7
  • भाजप 104, सपा+काँग्रेस 33, बसपा 21, इतर 6
  • उत्तर प्रदेशात भाजपची घोडदौड, भाजपची आघाडी 100 वर
  • भाजप 99, सपा+काँग्रेस 45, बसपा 21, इतर 7
  • भाजप 87, सपा+काँग्रेस 29, बसपा 21, इतर 5
  • भाजप 52, सपा+काँग्रेस 25, बसपा 16, इतर 4
  • भाजप 31, सपा 16, काँग्रेस 4, बसपा 8, इतर 3
  • भाजपची आगेकूच, मायावती, अखिलेश समसमान
  • पहिल कल मायावतींना
  • पोस्टल मतमोजणी सुरु
  पण सर्वाधिक लक्ष लागलंय ते उत्तर प्रदेशकडे. कारण देशातलं सर्वात मोठं राज्य असलेल्या या राज्यावर प्रत्येक पक्षाला आपली सत्ता प्रस्थापित करायची आहे. उत्तर प्रदेशवर सत्ता मिळवणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण त्यावर राज्यसभेतली अनेक समीकरणं अवलंबून आहेत. उत्तर प्रदेश विधानसभेत 403 जागा आहेत. या जागांसाठी निवडणूक होत आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा समाजावादी पक्ष आणि राहुल गांधी यांचा काँग्रेस एकत्र लढत आहेत. सपा-काँग्रेसला भाजपचं तगडं आव्हान आहे. तर  मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीचंही कडवं आव्हान आहे. संबंधित बातम्या
 ABP Exit poll: यूपीत कोणाची बाजी?

नवी दिल्ली

ABP Exit Poll - कोणत्या राज्यात कोणाची सत्ता? सर्व एक्झिट पोल एकाच ठिकाणी
.. तर मायावतींशी हातमिळवणी करु : अखिलेश यादव
भाजपाची सत्ता आल्यास अमित शाह यूपीचे मुख्यमंत्री?
उत्तर प्रदेशात कुणाचं सरकार? सर्व एक्झिट पोल एकाच ठिकाणी
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी

व्हिडीओ

Girish Mahajan Jalgaon : एकनाथ खडसे आमच्यासाठी अपशकुन, जळगावच्या निकालावर महाजन थेटच बोलले..
Eknath Khadse on BJP : रक्षा खडसे एकट्या पडल्या, त्यामुळे मी शेवटचे दोन दिवस मैदानात उतरलो
Sudhir Mungantiwar on BJP : पक्षनेतृत्वाकडून गटबाजीबाबत विधान, सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर?
Rajan Salvi on Dharashiv : निंबाळकर,कैलास पाटलांना मोठा धक्का,ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदेंचा विजय
Beed Ambajogai Namita Mundada : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊनही पराभव; नमिता मुंदडांची जादू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
IND vs PAK U19 Asia Cup Final : वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रे फ्लॉप, आशिया कप अंडर 19 फायनलमध्ये भारताचा पराभव, पाकिस्तानचा दणदणीत विजय
वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रे फ्लॉप, आशिया कप अंडर 19 फायनलमध्ये भारताचा पराभव, पाकिस्तानचा दणदणीत विजय
लोकसभेला, विधानसभेला चुकलेला गुलाल राजू शेट्टींनी अखेर पाहिला; मुश्रीफ-घाटगे युतीला मुरगूडला धक्का; सतेज पाटलांचं शिरोळ हातकणंगलेत बेरजेचं राजकारण जमलं
लोकसभेला, विधानसभेला चुकलेला गुलाल राजू शेट्टींनी पाहिला; मुश्रीफ-घाटगे युतीला कागलात यश, मुरगूडला धक्का
Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025 Nagarsevak Winner List: कोकणपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; संपूर्ण महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी!
Nagarsevak Winner List: कोकणपासून मराठवाडा, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी!
Railway Fare Increase :लाखो रेल्वे प्रवाशांना धक्का, भारतीय रेल्वेकडून सहा महिन्यात दुसऱ्यांदा प्रवासभाड्यात वाढ, 26 डिसेंबरपासून नवे दर लागू 
लाखो रेल्वे प्रवाशांना धक्का, भारतीय रेल्वेकडून प्रवासभाड्यात वाढ, 26 डिसेंबरपासून नवे दर लागू 
Embed widget