एक्स्प्लोर
पदार्पणातच मुलायम यांच्या सूनबाई अपर्णा यादव पराभूत

लखनऊ : उत्तर प्रदेशात सत्ताधारी समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मुलायम सिंह यांच्या धाकट्या सूनबाई अपर्णा यादव यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं. काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या रिता बहुगुणा जोशी यांनी अपर्णा यांना धोबीपछाड केलं.
लखनऊ कँटोनमेंटमधून अपर्णा यादव यांचा पराजय झाला. अपर्णा यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती. अपर्णा यादव यांनी मतदारसंघात अनेक रॅलीही घेतल्या होत्या, मात्र त्यांच्या विरोधात रिता बहुगुणा जोशींसारखी दमदार उमेदवार असल्यामुळे त्यांना पराभवाचा धक्का बसल्याचं म्हटलं जात आहे.
लखनऊ कँटोनमेंट मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यामध्ये मतदान झालं होतं. सासरे मुलायम सिंह यांच्याप्रमाणेच अखिलेश यांच्या पत्नी डिम्पल यादव यांनीही जाऊबाईंसाठी सभा घेतल्या होत्या.
अपर्णा या मुलायम यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता यांचा मुलगा प्रतीकच्या पत्नी आहेत. अपर्णा यादव यांच्याकडे लँबोर्गिनी कारसह 23 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
उत्तर प्रदेशात भाजपच्या वाट्याला 315 हून अधिक जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस आणि सपा यांची आघाडी असून सपाला 50 च्या घरात जागा मिळाल्या आहेत.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement


















