Nitin Gadkari : गडकरी घेणार 'दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे'च्या कामाचा आढावा; दोन दिवसांचा दौरा आजपासून सुरु
'दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे'च्या हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश आणि गुजरात या चार राज्यांतील कामाचा आढावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये घेणार आहेत.
नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज आणि उद्या दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे च्या कामांचा आढावा घेणार आहेत. हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश आणि गुजरात या चार राज्यांतील हायवेच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. (Gadkari to review progress of Delhi-Mumbai Expressway). गडकरींच्या या दोन दिवसांच्या दौऱ्यातील पहिला कार्यक्रम हा आज (16 सप्टेंबर) सकाळी 8 वाजता हरियाणातल्या सोहना या गावात आहे.
Union Minister @nitin_gadkari to review the progress of Delhi-Mumbai Expressway on 16th – 17th September covering the States of Delhi, Haryana, Rajasthan, Madhya Pradesh and Gujarat
— PIB India (@PIB_India) September 15, 2021
Read: https://t.co/peiMBpv0k9 pic.twitter.com/JfdchkU27h
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे ची वैशिष्ट्ये
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे हा देशातला सर्वात मोठ्या लांबीचा एक्सप्रेस वे आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईमधलं दळवळण सुकर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे. एकूण 1380 किलोमीटर लांबीचा एक्सप्रेसवे असून याच्या विकासासाठी 98 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सन 2018 मध्ये या एक्सप्रेस वे च्या कामाला मंजुरी देण्यात आली होती.
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे च्या कामाचे 9 मार्च 2019 रोजी भूमिपूजन करण्यात आलं. हा हायवे दिल्ली-हरयाणा-राजस्थान-गुजरात-मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या सहा राज्यांना कव्हर करतो. या हायवेच्या माध्यमातून दिल्ली-मुंबई कॉरिडॉरमधील आर्थिक विकासाला चालण्या देण्यात येणार आहे. या हायवेच्या आजूबाजूला असणाऱ्या जयपूर, किशनगड, अजमेर, कोटा, चित्तोडगड, उदयपूर, भोपाळ, उज्जेन, इंदोर, अहमदाबाद, वडोदरा आणि सुरत या शहरातील आर्थिक क्रियांना अधिक चालना मिळण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Terrorist Arrested : दाऊदच्या जुन्या हस्तकांवर लक्ष ठेवा; मुंबई पोलिसांना आदेश
- Elon Musk's SpaceX Inspiration 4 : इलॉन मस्क यांच्या SpaceX नं रचला इतिहास, पहिल्यांदाच घडवली चार सामान्य लोकांना अंतराळाची सफर
- दहशतवाद्यांचा घातपाताचा कट उधळल्यानंतर मुंबई 'हायअलर्ट'वर; मुंबई लोकलच्या सुरक्षेसाठी नवं मॉडल उभारणार