एक्स्प्लोर

पॅरामिलिट्री फोर्सना परवानगीशिवाय सोशल मीडिया वापरण्यास बंदी

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयानं पॅरामिलिट्री फोर्सना परवानगीविना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घातली आहे. बीएसएफ आणि सीआरपीएफच्या जवानांचे व्हिडिओ लागोपाठ समोर आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयानं सावध पवित्रा घेतला आहे. ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि यूट्यूब यासारख्या सोशल मीडियांचा वापर पॅरामिलिट्रीतील जवानांना यापुढे संमतीशिवाय करता येणार नाही. कुठलेही वैयक्तिक फोटो किंवा व्हिडिओ त्यांना सोशल मीडियावर पोस्ट करता येणार नाहीत. पॅरामिलिट्री जवानांना कुठलीही पोस्ट सोशल मीडियावर टाकण्यापूर्वी त्यांच्या वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल. गेल्या काही वर्षांमध्ये अधिकाधिक जवानांकडे स्मार्टफोन आले आहेत. त्यापैकी अनेक जण सोशल मीडियावर अॅक्टिव्हही असतात. ही सवय कमी करण्यासाठी कडक शिस्तीचं पालन करण्यात येणार असल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी स्पष्ट केलं. पॅरामिलिट्री जवान आणि आर्मी जवानांमध्ये मोठा भेदभाव होत असल्याचा आरोप पॅरामिलिट्री जवानांनी केला आहे. मात्र आर्मीच्याही अनेक युनिट्समध्ये याआधीच स्मार्टफोनवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचं कडेकोट पालन आता केलं जात आहे.

व्हिडीओ अपलोड करणारा जवान आता 'प्लंबर', BSFकडून तेज बहादूरची बदली

बीएसएफ जवान तेज बहादूर यादवनं अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करीत फेसबूकवर व्हिडिओ अपलोड करुन खळबळ माजवली होती. सीमेवर बिकट परिस्थितीत देशाची सेवा करतो आणि जेवणासाठी आलेलं सामान वरिष्ठ अधिकारी बाजारात विकत असल्याचे म्हणत त्याने नाराजी व्यक्त केली आहे. अनेकवेळा तर उपाशी झोपावं लागत, असल्याचंही या जवानाने म्हटलं आहे. त्यानंतर बीएसएफने एक पत्रक काढून तेज बहादूर मानसिक रुग्ण असल्याचं स्पष्टीकरण दिलं. सध्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु आहे. दरम्यान, या सर्व प्रकारानंतर तेज बहादूर यादवची दुसऱ्या युनिटमध्ये बदली करण्यात आली आहे.

BSF जवानापाठोपाठ CRPF जवानाचा व्हिडीओ व्हायरल

तेजबहादूर यांच्यानंतर मथुरेतील सीआरपीएफच्या जवानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. जीत सिंह असं या जवानाचं नाव असून त्याने या व्हिडिओद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर आपल्या समस्या मांडल्या आहेत. जीत सिंह यांनी या व्हिडीओद्वारे लष्कर आणि सीआरपीएफच्या जवानांना मिळणाऱ्या सुविधांमधील तफावतीवर बोट ठेवलं आहे. पेन्शनसह ज्या सुविधा लष्कराला मिळतात त्या सीआरपीएफच्या जवानांनाही मिळाव्यात, अशी मागणी जीतसिंह यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे

संबंधित बातम्या:

जवान तेज बहादूरचा बीएसएफवर आणखी एक आरोप

‘मी बेशिस्त होतो तर मला पुरस्कार का दिले’, जवानाचा बीएसएफला सवाल

जवानच बेशिस्त असल्याचा बीएसएफचा आरोप

VIDEO : काळीज पिळवटून टाकणारा BSF जवानाचा व्हिडीओ व्हायरल

महत्त्वाच्या बातम्या

BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget