Union Budget 2024 Live Highlights : अर्थसंकल्पानंतर महाविकास आघाडीच्या खासदारांचे संसदेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन 

Budget Presentation 2024 Live updates : अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बजेट भाषणात मोठ्या घोषणा केल्या. तरुण, शेतकऱ्यांसाठी काही घोषणा करण्यात आल्या.

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 23 Jul 2024 04:39 PM
शेतकऱ्यांना क्रांती आणणारा अर्थसंकल्प

सदाभाऊ खोत यांची बजेटवर प्रतिक्रिया


शेतीविषयक पायाभूत सुविधा आणि मार्केटिंग बाबत निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मदत


१ लाख ५२ हजार कोटी ची तरतूद... 


शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम ही अर्थसंकल्पात केलं 


भाजीपाला वाहतुकीसाठी साखळी करण्याचे निर्णय... नवे वारायटी आणण्याचा निर्णय.. 


शेतकऱ्यांना क्रांती आणणारा अर्थसंकल्प आहे 


विरोधकांचे काम आहे की कोणती पण चांगली गोष्ट त्यांना नवडत .... शिमगा करतात.... 


केंद्र आणि राज्य ने काही योजना आखल्या तर विरोधक उणीव काढतात..त्यांच्या कांगवा ला अर्थ नाही... 


शेतकरी चळवळ टिकली पाहिजे हे अत्यंत महातवचे आहे... पण स्वतः च्या अहंकार मुळे स्वाभिमान शेतकरी संघटना ला ग्रहण लागले .. भागाकार खाऊन तुळशीपत्र ठेवून संघटनेसाठी काम केले... त्यांच्यावर काढण्याची बाब आली...

Union Budget 2024 : अर्थसंकल्पानंतर महाविकास आघाडीच्या खासदारांचे संसदेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन 

नवी दिल्ली : अर्थसंकल्पानंतर महाविकास आघाडीच्या खासदारांचे आंदोलन


 संसदेच्या प्रवेशद्वारावर खासदारांचे आंदोलन 


काँग्रेस शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आंदोलनात सहभागी

Union Budget 2024 : नव्या करप्रणालीनुसार कररचनेत बदल 

Nirmala Sitharaman Union Budget 2024 Speech : नव्या करप्रणालीनुसार कररचनेत बदल 


०-३ लाख- कर नाही
३-७ लाख - ५ टक्क
 ७-१० लाख- १० टक्के
१०-१२ लाख- १५ टक्के
१२-१५ लाख- २० टक्के
१५ लाखांपेक्षा अधिक- ३० टक्के कर

Union Budget 2024-25 LIVE: नव्या कर प्रणालीत बदल

Union Budget 2024-25: नव्या कर प्रणालीत बदल करण्यात आलेत. 



  • 0 ते 3 लाख : 0 कर 

  • 3 ते 7 लाख : 5 टक्के कर 

  • 7 ते 10 लाख : 10 टक्के

  • 10 ते 12 लाख : 15 टक्के 

  • 15 लाखांवर उत्पन्न : 30 टक्के आयकर


 


 

Union Budget 2024 : ग्रामीण भागातील प्रत्येक जागेसाठी आता भू-आधार

ग्रामीण भागातील जमिनींसाठी यूनिक लँड पर्सनल लँड आयडेटिंफिकेशन नंबर दिला जाईल. त्यालाच भू-आधार म्हटले जाईल. 

Union Budget 2024-25: नोकरदारांसाठी स्टॅडर्ड डिडक्शन 50 हजारांहून 75 हजारांवर 

Union Budget 2024-25: नोकरदारांसाठी स्टॅडर्ड डिडक्शन 50 हजारांहून 75 हजारांवर 

Budget updates : 9 सूत्री पाच योजनांची घोषणा

9 सूत्री पाच योजनांची घोषणा


1. कृषी क्षेत्रातील उत्पादकता आणि लवचिकता
2. रोजगार आणि कौशल्ये
3. सर्वसमावेशक मानव संसाधन विकास आणि सामाजिक न्याय
4. उत्पादन आणि सेवा
5. शहरी विकास
6. ऊर्जा संवर्धन
7. पायाभूत सुविधा
8. नवोपक्रम, संशोधन आणि विकास
9. नवीन पिढी सुधारणा

रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणाशी संबंधित 5 योजनांसाठी 2 लाख कोटी रुपये


 अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, 'भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ उत्कृष्ट आहे. भारताची चलनवाढ स्थिर राहून ४% च्या लक्ष्याकडे वाटचाल करत आहे. गरीब, तरुण, महिला, शेतकरी अशा महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. रोजगार, कौशल्य, एमएसएमई, मध्यमवर्गावर सतत लक्ष केंद्रित केले जात आहे.  रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणाशी संबंधित 5 योजनांसाठी 2 लाख कोटी रुपयांचे बजेट आहे.

Union Budget 2024-25 LIVE : नोकरदार वर्गासाठी मोठ्या घोषणा 

  • EPFO अंतर्गत पहिल्यांदाच नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, एका महिन्याच्या पगाराच्या 15,000 रुपयांपर्यंत थेट लाभ हस्तांतरणाद्वारे तीन हप्त्यांमध्ये जारी केला जाईल.

  • कंपनी आणि कर्मचारी दोघांनाही नोकरीच्या पहिल्या चार वर्षांत EPFO ​​योगदान अंतर्गत थेट प्रोत्साहन दिलं जाईल.

  • नियोक्त्यांना पाठिंबा देण्यासाठी, सरकारनं अर्थसंकल्पात म्हटलं आहे की, अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या मासिक योगदानाची दोन वर्षांसाठी 3 हजार रुपयांपर्यंत परतफेड केली जाईल.

Union Budget 2024 : महाबोधी, विष्णूपद मंदिरासाठी कॉरिडोअरची निर्मिती केली जाणार

Nirmala Sitharaman Union Budget 2024 Speech :


बिहारमधील महाबोधी मंदिरासाठी कॉरीडोअरची निर्मिती केली जाणार 


गया येथील विष्णूपद मंदिरासाठी कॉरिडोअरची निर्मिती


पर्यटनाच्या विकासासाठी सरकार प्रयत्न करणार 

Budget 2024-25 LIVE : पीएम मुद्रा कर्ज मर्यादा दुप्पट; आता 20 लाख रुपयांचं कर्ज मिळणार 

Budget 2024-25 LIVE : मोदी 3.0 चा पहिला अर्थसंकल्प सादर होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात मोठी घोषणा केली. पंतप्रधान मुद्रा योजनेसंदर्भात मोठी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या सरकारी योजनेअंतर्गत मुद्रा कर्जाची मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे. यापूर्वी या योजनेअंतर्गत एमएसएमईंना 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिलं जात होतं, ते आता 20 लाख रुपये करण्यात आलं आहे.

Union Budget 2024-25 LIVE : अर्थसंकल्पात बळीराजासाठी काय? 

Union Budget 2024-25 LIVE : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. सरकार यंदा नैसर्गिक शेतीला चालना देणार असल्याचं त्यांनी अर्थसंकल्प जाहीर करताना सांगितलं. "ही योजना राबवू इच्छिणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये त्याचा प्रचार केला जाईल. आम्ही कडधान्ये आणि तेलबियांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देत आहोत. जेणेकरून आपण या बाबतीत स्वावलंबी होऊ शकू. जेणेकरून मोहरी, सोयाबीन इत्यादी तेलबिया उत्पादनांमध्ये देश आघाडी घेऊ शकेल.", असं त्या म्हणाल्या. 

Union Budget 2024 : काय स्वस्त काय महाग?

Nirmala Sitharaman Union Budget 2024 Speech : काय स्वस्त, काय महाग?


मोबाईल चार्जरच्या कमिती 15 टक्क्यांनी कमी होणार 


मोबाईल हँडसेटही आता स्वस्त होणार आहे. 


मोबाईलचे सुटे भागही आता स्वस्त होणार आहेत


प्लॅस्टिक उद्योगांवर कराचा बोजा वाढणार आहे.

Union Budget 2024 : पायाभूत सुविधांच्या विकासासाठी खासगी गुंतवणुकीला प्रोत्हासन दिले जाणार- निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Union Budget 2024 Speech :
पायाभूत सुविधांच्या विकासासाठीही केंद्र सरकारकडू प्रयत्न केला जाणार 


राज्य सरकारांना पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रयत्न केले जाणार 


पायाभूत सुविधांच्या विकासासाठी खासगी गुंतवणुकीला प्रोत्हासन दिले जाणार

Women Budget 2024 : महिला आणि मुलींसाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद

महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या 100 हून अधिक शाखा ईशान्येकडील भागात स्थापन केल्या जातील. देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पोलावरम सिंचन प्रकल्प पूर्ण केला जाईल. विशाखापट्टणम-चेन्नई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमधील कोपर्थी क्षेत्र आणि हैदराबाद-बेंगळुरू इंडस्ट्रियल कॉरिडॉरमधील ओरवाकल क्षेत्राच्या विकासासाठी निधी दिला जाईल.

Union Budget 2024 : पीएम सूर्यघर मोफत वीज योजना उत्स्फूर्त प्रतिसाद, १४ लाख अर्ज आले

Nirmala Sitharaman Union Budget 2024 Speech :
पीएम सूर्यघर मोफत वीज योजना लागू करण्यात आलेली आहे. 


१ कोटी घरांना ३०० यूनिट्सपर्यंत मोफत विज मिळावी यासाठी ही योजना आहे.


या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला


या योजनेसाठी १.२८ कोटींपेक्षा अधिक रजिस्ट्रेशन झाले आहेत. 


१४ लाख अर्ज आलेले आहेत. 

Union Budget 2024 : पीएम आवास योजनेअंतर्गत- शहरी भागातील लोकांच्या घरासाठी मदत केली जाणार

Nirmala Sitharaman Budget 2024 Speech :
पीएम आवास योजनेअंतर्गत ( शहरी भाग) १ कोटी मध्यमवर्ग, गरीब लोकांना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रयत्न केले जाणार


त्यासाठी १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार


त्याचाच एक भाग म्हणून केंद्राकडून पुढच्या पाच वर्षांत २.२ लाख कोटी रुपयांची मदत 

Union Budget 2024 : ३० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या १४ शहरांच्या विकासासाठी प्रयत्न केला जाणार

Nirmala Sitharaman Budget 2024 Speech :
शहरांच्या विकासासाठी प्रयत्न केले जाणार


३० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या १४ शहरांच्या विकासासाठी प्रयत्न केला जाणार


या शहरांच्या विकासासाठी आर्थिक मदत केली जाणार


अशा शहरांच्या विकासासाठी नियोजनही केले जाणार  

Union Budget 2024 Live Update : नॅशनल इन्डस्ट्रियल कॉरिडोअर अंतर्गत 12 इन्टस्ट्रियल पार्क्स उभारले जाणार 

Nirmala Sitharaman Budget 2024 Speech :


नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडोअर अंतर्गत १२ इन्टस्ट्रियल पार्क्स उभारले जाणार 


खाद्यपदार्थांची गुणवत्ता सुधारावी म्हणून नव्या 100 लॅब्स उभारल्या जाणार 

Pradhan Mantri Awas Yojana-Urban - पंतप्रधान शहरी गृहनिर्माण योजना

PM अर्बन हाऊसिंग योजना - पंतप्रधान शहरी गृहनिर्माण योजना 


पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 3 कोटी नवीन घरे बांधली जाणार आहेत
पीएम शहरी गृहनिर्माण योजनेसाठी ~10 लाख कोटींची घोषणा
रेंटल हाऊसिंगचा प्रचार आणि नियमन करण्यासाठी नियम बनवेल
मुद्रांक शुल्क कमी करणाऱ्या राज्यांना प्रोत्साहन दिले जाईल

Union Budget 2024 : देशातील 1 कोटी तरुणांना दिली जाणार इन्टर्नशीप, 12 महिन्यांसाठी मिळणार इन्टर्नशीप

Nirmala Sitharaman Budget 2024 Speech :
देशातील १ कोटी तरुणांना इन्टर्नशीप देण्यात येणार 


टॉपच्या कंपन्यात इन्टर्नशीप देण्यात येणार 


पुढच्या पाच वर्षांत १ कोटी तरुणांना देण्यात येणार इन्टर्नशीप


१२ महिन्यांच्या कालावधीसाठी दिली जाणार इन्टर्नशीप 


इन्टर्नशीपच्या काळात तरुणांना अलाऊन्स म्हणून ५ हजार रुपये प्रतिमहिना मिळणार


वन टाईम असिस्टन्स म्हणून ६ हजार रुपये दिले जाणार

Youth Budget 2024 : बजेटमध्ये तरुणांसाठी काय?

Youth  Budget 2024 : बजेटमध्ये तरुणांसाठी काय?



  • खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने ई-कॉमर्स निर्यात केंद्र तयार केले जाईल आणि तरुणांच्या इंटर्नशिपसाठी सर्वसमावेशक योजना आणली जाईल.  

  • 5 वर्षात टॉप 500 कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप, 100 शहरांमध्ये औद्योगिक पार्क विकसित केले जातील.

  • MSME हमी योजनेअंतर्गत 100 कोटी रुपयांपर्यंतची कर्जे उपलब्ध होतील, PSU बँकांनी अंतर्गत मूल्यांकनानंतर MSME ला कर्ज द्यावे, 

  • MUDRA कर्ज मर्यादा 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. MSME ला मदत करण्यासाठी SIDBI शाखा वाढवणार आहे

  • देशात उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची घोषणा

  • दरवर्षी 25000 विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात 7.5 लाख रुपयांचे कर्ज मिळेल.

  • पहिल्या कामावर थेट EPFO ​​खात्यात 15 हजार रुपये दिले जातील

Budget LIVE Updates : सरकार एक महिन्याचा पगार DBT द्वारे देईल: सीतारामन

Budget LIVE Updates : पंतप्रधान पॅकेजचा एक भाग म्हणून अर्थमंत्र्यांनी योजनांच्या माध्यमातून रोजगारक्षम कौशल्यांची घोषणा केली. त्या म्हणाल्या की, या योजना ईपीएफओमधील नामांकनांवर आधारित असतील, ज्यात पहिल्यांदाच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओळखण्यावर भर असेल.


अर्थमंत्र्यांनी सांगितलं की, सर्व औपचारिक क्षेत्रातील कामगारांना पहिल्यांदाच कार्यालयात प्रवेश केल्यावर एक महिन्याचा पगार मिळेल. एका महिन्याच्या पगाराचे थेट लाभ हस्तांतरण (DBT) 15,000 रुपयांपर्यंत, तीन हप्त्यांमध्ये प्रदान केले जाईल. या फायद्यासाठी पात्रता मर्यादा 1 लाख रुपये प्रति महिना पगार असेल आणि 2.1 लाख तरुणांना याचा लाभ अपेक्षित आहे.

Union Budget 2024 : मुद्रा योजनेअंतर्गत २० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार- निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Budget 2024 Speech : केंद्र सरकारचा मोठा निर्णय, मुद्रा योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जात वाढ


मुद्रा योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जात वाढ


मुद्रा योजनेअंतर्गत २० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार. 


याआधीचे कर्ज यशस्वीरित्या फेडलेल्यांना दिले जाणार २० लाखांपर्यंत कर्ज दिले जाणार

Union Budget 2024-25 LIVE : उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज

Union Budget 2024-25 LIVE : अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी सरकारकडून आर्थिक मदत जाहीर केली. कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढवणं याला प्राधान्य असेल, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. वसतिगृह बांधण्यासाठी आणि महिलांसाठी विशेष कौशल्य कार्यक्रम आयोजित करण्यासाठी भागीदारी करून हे सुलभ केले जाईल असंही अर्थमंत्री म्हणाल्या आहेत.

Nirmala Sitharaman Budget 2024 Speech : आंध्र प्रदेशच्या विकासासाठी १५ हजार कोटींची तरतूद

Nirmala Sitharaman Budget 2024 Speech :


लघु आणि शूक्ष्म उद्योगांच्या विकासासाठी मदत केली जाणार 


आंध्र प्रदेशच्या विकासासाठी १५ हजार कोटींची तरतूद


महिला आणि बालकल्याणासाठी केंद्राकडून 3 लाख कोटींची तरतूद

Union Budget 2024-25 LIVE : महिला आणि मुलींसाठी 3 लाख कोटी रुपये

Union Budget 2024-25 LIVE : महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या 100 हून अधिक शाखा ईशान्येकडील भागात स्थापन केल्या जातील. देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पोलावरम सिंचन प्रकल्प पूर्ण केला जाईल. विशाखापट्टणम-चेन्नई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमधील कोपर्थी क्षेत्र आणि हैदराबाद-बेंगळुरू इंडस्ट्रियल कॉरिडॉरमधील ओरवाकल क्षेत्राच्या विकासासाठी निधी दिला जाईल.

Nirmala Sitharaman Budget 2024 Speech : ग्रामीण विकासासाठी 2.66 लाख कोटी रुपयांची तरतूद, निर्मला सीतारामन यांची घोषणा

Nirmala Sitharaman Budget 2024 Speech :


ग्रामीण विकासासाठी 2.66 लाख कोटी रुपयांची तरतूद


अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडू घोषणा

Nirmala Sitharaman Budget 2024 Speech : ग्रामीण विकासासाठी 2.66 लाख कोटी रुपयांची तरतूद, निर्मला सीतारामन यांची घोषणा

Nirmala Sitharaman Budget 2024 Speech :


ग्रामीण विकासासाठी 2.66 लाख कोटी रुपयांची तरतूद


अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडू घोषणा

Budget 2024 Live Updates: शैक्षणिक कर्जाच्या व्याजावर सवलत

Budget 2024 Live Updates: केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये दरवर्षी 25 हजार विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी मॉडेल स्किल लोन योजनेत सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. देशांतर्गत संस्थांमधील उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी ई-व्हाऊचर दरवर्षी 1 लाख विद्यार्थ्यांना कर्जाच्या रकमेच्या 3 टक्के वार्षिक व्याज सवलतीसाठी थेट दिले जातील.

Nirmala Sitharaman Budget 2024 Speech :  पीएम आवास योजनेअंतर्गत अतिरिक्त 3 कोटी घरं बांधली जाणार

Nirmala Sitharaman Budget 2024 Speech :  पीएम आवास योजनेअंतर्गत ग्रामीण तसेच शहरी भागात अतिरिक्त 3 कोटी घरं बांधण्यात येतील. त्यासाठी गरजेची तरतूद करण्यात आली आहे.

Budget 2024 Live : आंध्र प्रदेशमध्ये औद्योगिक विकासासाठी आर्थिक मदत केली जाणार- निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Budget 2024 Speech :  आंध्र प्रदेशमधील उद्योगांच्या विकास आणि प्रचारासाठी पाणी, वीज, रस्ते अशा पायाभूत सुविधांच्या विकासाचा विकास केला जाणार आहे. त्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल. 

Budget 2024 Live Updates: अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी विशेष तरतूद

Budget 2024 Live Updates: बिहारमधील रस्ते प्रकल्पांसाठी 26 हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. बिहारमध्ये 21 हजार कोटी रुपयांच्या पॉवर प्लांटचीही घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय बिहारला आर्थिक मदत मिळणार आहे. आंध्र प्रदेशला सुमारे 15 हजार कोटी रुपयांचे पॅकेज मिळणार आहे.

Budget 2024 Live Updates: आंध्र प्रदेशला अतिरिक्त आर्थिक मदत; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

Budget 2024 Live Updates: निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात आंध्र प्रदेशला अतिरिक्त आर्थिक मदत जाहीर केली आहे.

Budget 2024 : केंद्र सरकारकडून आंध्र प्रदेशसाठी मोठी आर्थिक तरतूद, 15 हजार कोटींची तरतूद

Nirmala Sitharaman Budget 2024 Speech : केंद्र सरकारने आंध्र प्रदेशलादेखील मोठी  आर्थिक मदत करण्याचं ठरवलं आहे. सध्याच्या आर्थिक वर्षात आंध्र प्रदेशला 15 हजार कोटी रुपये दिले जातील. भविष्यातही या आर्थिक निधीत वाढ होईल. 

Nirmala Sitharaman Speech: विद्यार्थ्यांना 7.5 लाख रुपयांचे स्किल मॉडेल कर्ज : अर्थमंत्री

Nirmala Sitharaman Speech: अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा  



  • मोफत रेशनची व्यवस्था 5 वर्षे सुरू राहील.

  • यावर्षी कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद.

  • रोजगारासाठी सरकार 3 मोठ्या योजनांवर काम करणार आहे.

  • बिहारमध्ये 3 एक्सप्रेसवेची घोषणा.

  • बोधगया-वैशाली द्रुतगती मार्ग बांधला जाईल.

  • पाटणा-पूर्णिया एक्स्प्रेस वेचे बांधकाम.

  • बक्सरमध्ये गंगा नदीवर दुपदरी पूल.

  • बिहारमध्ये एक्सप्रेस वेसाठी 26 हजार कोटींची तरतूद.

  • विद्यार्थ्यांना 7.5 लाख रुपयांचे स्किल मॉडेल कर्ज.

  • पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पीएफ

  • नोकऱ्यांमध्ये महिलांना प्राधान्य

Nirmala Sitharaman Budget 2024 Speech : केंद्राकडून बिहारला मोठं गिफ्ट, विकासासाठी भरीव तरतूद

Nirmala Sitharaman Budget 2024 Speech :  केंद्र सरकारने बिहार सरकारला मोठे गिफ्ट दिले आहे. बिहारमध्ये रस्त्याच्या विकासासाठी 26 हजार कोटी रुपये देण्यात येणार आहेत. बिहारमध्ये नवे विमानतळ, वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी अतिरिक्त आर्थिक मदत केली जाणार आहे. 

Nirmala Sitharaman Budget 2024 Speech : रस्त्यांच्या विकासासाठी २६ हजार कोटी रुपयांची तरतूद

Nirmala Sitharaman Budget 2024 Speech : रस्ते मार्गाच्या विकासासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातील. त्यासाठी तब्बल २६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे.

Union Budget 2024-25 : रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणाशी संबंधित 5 योजनांसाठी 2 लाख कोटी रुपये

Union Budget 2024-25 LIVE : अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, "भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ उत्कृष्ट आहे. भारताची चलनवाढ स्थिर राहून 4 टक्क्यांच्या लक्ष्याकडे वाटचाल करत आहे. गरीब, तरुण, महिला, शेतकरी अशा महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. रोजगार, कौशल्य, एमएसएमई, मध्यमवर्गावर सतत लक्ष केंद्रीत केलं जात आहे. ते म्हणाले की, रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणाशी संबंधित 5 योजनांसाठी 2 लाख कोटी रुपयांचे बजेट आहे. 

Budget 2024 Live Updates: तरुणांसाठी 5 नव्या योजनांची घोषणा

Budget 2024 Live Updates: अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, 2 लाख कोटी रुपयांच्या केंद्रीय खर्चासह 5 वर्षांतील 4.1 कोटी तरुणांना रोजगार, कौशल्य आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी 5 योजना आणि उपक्रमांचे पंतप्रधान पॅकेज जाहीर करताना मला आनंद होत आहे. यावर्षी आम्ही शिक्षण, रोजगार आणि कौशल्यांसाठी 1.48 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Budget 2024 LIVE : सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्पातील आश्वासनांचा उल्लेख

Budget 2024 LIVE : अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, "अंतरिम अर्थसंकल्पात नमूद केल्याप्रमाणे, आम्हाला 4 विविध जाती, गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यावर लक्ष केंद्रीत करणं आवश्यक आहे. शेतकऱ्यांसाठी, आम्ही सर्व प्रमुखांसाठी उच्च किमान आधारभूत किंमत जाहीर केली आहे. पीएम गरीब कल्याण अन्न योजना 5 वर्षांसाठी वाढवली आहे, त्यामुळे 80 कोटींहून अधिक लोकांना लाभ झाला आहे.

Nirmala Sitharaman Budget 2024 Speech : विद्यार्त्यांना देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांचे अर्ज

Nirmala Sitharaman Budget 2024 Speech :  केंद्र सरकारकडून २० लाख तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. कोणत्याही योजनेसाठी पात्र नसलेल्या विद्यार्थ्यांना देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांचे अर्ज देण्यात येईल.





Union Budget 2024-25 LIVE : रोजगार वाढवण्यावर सरकारचा भर, रोजगार वाढवणं ही सरकारची प्राथमिकता : अर्थमंत्री

Union Budget 2024-25 LIVE : अर्थमंत्री निर्मला सीतारमन म्हणाल्या की, "अर्थसंकल्प सर्वांच्या विकासाचा आहे. हा विकसित भारताचा रोडमॅप आहे. ऊर्जा सुरक्षेवर सरकारचं लक्ष आहे. रोजगार वाढवण्यावर सरकारचा भर आहे. रोजगार वाढवणं ही सरकारची प्राथमिकता आहे. नैसर्गिक शेती वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच, 32 पिकांसाठी 109 जाती लाँच करणार आहेत. कृषी क्षेत्राच्या विकासाला प्रथम प्राधान्य देण्यात आलं आहे. 

Union Budget 2024-25 : कठीण काळात भारतीय अर्थव्यवस्थेची दमदार कामगिरी : अर्थमंत्री निर्मला सीतारामन

Union Budget 2024-25 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी अर्थसंकल्प सादर करत आहेत. संसदेत त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन म्हणाल्या की, "भारतातील जनतेनं पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे. ऐतिहासिक तिसऱ्यांदा त्यांची पुन्हा निवड झाली आहे. कठीण काळातही भारताची अर्थव्यवस्था दमदार कामगिरी."

Nirmala Sitharaman Budget 2024 Speech : शेती क्षेत्रासाठी तब्बल 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद - निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Budget 2024 Speech : सरकारकडून शेती, तसेच शेतीपुरक क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे निर्मला सीतारामन म्हणाल्या. 

Nirmala Sitharaman Budget 2024 Speech : नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्यावर भर दिला जाणार- निर्मला सितारामन

Nirmala Sitharaman Budget 2024 Speech :  नैसर्गिक शेती करण्याला सरकारकडून प्राधान्य दिले जाणार.  डाळ आणि तेलबियांच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न केला जाईल. 

Budget 2024 Live Updates: अर्थव्यवस्था वेगानं वाढतेय : अर्थमंत्री

Budget 2024 Live Updates: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातील महत्त्वाचे मुद्दे... 



  • भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे.

  • भारतात महागाई नियंत्रणात आहे.

  • हा अर्थसंकल्प गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यावर केंद्रित आहे.

  • अर्थसंकल्पात रोजगार आणि कौशल्यावर भर देण्यात आला आहे.

  • अर्थसंकल्पात तरुणांसाठी 2 लाख कोटींची तरतूद.

Nirmala Sitharaman Budget 2024 Speech : विकसित भारतासाठी 9 बाबींना प्राधान्य- निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Budget 2024 Speech : आम्ही अंतरिम अर्थसंकल्पात  विकसित भारताचा रोडमॅप देण्याचे आश्वासन दिले होते. विकसित भारतासाठी आम्ही 9 बाबींना प्राधान्य देत आहोत- निर्मला सीतारामन 

Union Budget 2024 : 2019 ते 2024 अर्थसंकल्पाबरोबरच अर्थमंत्र्यांच्या साड्यांचीही चर्चा; पाहा फोटो

Union Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर मोदी 3.0 सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. दरम्यान, अर्थसंकल्पाच्या सादरीकरणादरम्यान त्यांनी केलेल्या घोषणांसोबतच त्यांनी परिधान केलेल्या साड्यांचीही वेळोवेळी चर्चा झालेली आहे. सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा. 

Budget 2024 LIVE Updates: हळूहळू सर्वकाही कळेल; अर्थसंकल्यापूर्वी नितीश कुमार यांचं वक्तव्य

Budget 2024 LIVE Updates: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार बिहार विधान परिषदेत पोहोचले. त्यावेळी त्यांना राज्याला विशेष दर्जा मिळण्याबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी ते म्हणाले की, हळूहळू सर्वकाही कळेल. 

Nirmala Sitharaman Budget 2024 Speech : शिक्षण, नोकरी आणि कौशल्य विकासासाठी 1.48 लाख कोटी रुपयांची तरतूद- निर्मला सीतारामन

मी या वर्षी 1.48 लाख कोटी रुपयांची शिक्षण, नोकरी आणि कौशल्यासाठी तरतूद केली आहे. देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी जनतेन आम्हाला संधी दिली आहे.

Budget 2024 Live Updates: भारतात चलनवाढीचा दर सातत्यानं कमी होतोय : अर्थमंत्री

Budget 2024 Live Updates LIVE: अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्या म्हणाल्या की, मोदी सरकार सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आलंय. भारतात चलनवाढीचा दर सातत्यानं कमी होत आहे.

Nirmala Sitharaman Budget 2024 Speech : देशाच्या नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवला- निर्मला सीतारामन

देशाच्या नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवला आहे. म्हणूनच पुन्हा एकदा आमचे सरकार आले- निर्मला सीतारामन

Budget 2024 Live Updates: संसदेचं कामकाज सुरू

Budget 2024 Live Updates: संसदेचं कामकाज सुरू झालं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पीय भाषणास सुरुवात, थोड्याच वेळात अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 

Union Budget 2024 LIVE Updates : संसदेचं कामकाज चालू, ओम बिर्ला यांचे संसदेला संबोधन

संसदेचं कामकाज चालू झालं आहे. सध्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला संभागृहाला संबोधित करत आहेत. त्यांनी आपल्या संबोधनात टांझानियाहून आलेल्या विशेष पाहुण्यांचे स्वागत केले.

Union Budget 2024 LIVE Updates : केंद्रीय मंत्रिमंडळाकडून अर्थसंकल्पाला मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळाने अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे. 





Union Budget 2024 LIVE Updates : विरोधी पक्षनेते राहुल गांधी संसदेत दाखल, लवकरच अर्थसंकल्प सादर होणार

विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी संसदेत पोहोचले आहेत. सकाळी 11 वाजता निर्मला सितारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 





Union Budget 2024 : नरेंद्र मोदी संसदेत दाखल, लवकरच अर्थसंकल्प सादर होणार!

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता संसदेत आले आहेत. लवकरच अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात करतील.





Union Budget 2024 : संसद परिसरात आपच्या खासदारांचे आंदोलन, सरकारविरोधात घोषणाबाजी

अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे खासदार आक्रमक झाल आहेत. आपच्या खासदारांनी संसदेच्या आवारात सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या केंद्रीय संस्थाच्या कथित गैरवापराविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.





Union Budget 2024 : संसद परिसरात आपच्या खासदारांचे आंदोलन, सरकारविरोधात घोषणाबाजी

अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे खासदार आक्रमक झाल आहेत. आपच्या खासदारांनी संसदेच्या आवारात सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या केंद्रीय संस्थाच्या कथित गैरवापराविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.


 


 

Budget 2024 LIVE : अर्थसंकल्पाच्या मंजुरीसाठी मंत्रिमंडळाची बैठक, पुढच्या काही क्षणांत सादर होणार अर्थसंकल्प!

अर्थसंकल्पाच्या मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली.  





Union Budget 2024 Updates: AI तंत्रज्ञानामुळे भारतात मोठ्याप्रमाणावर नोकऱ्या जाणार?

भारतासारख्या निम्न मध्यम उत्पन्न वर्गातील अर्थव्यवस्थेक‍रिता कृत्रिम प्रज्ञेतील अतिगुंतवणूक धोक्याची ठरु शकते. आगामी काळात भारतात एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यास सर्व प्रकारच्या कौशल्य आधारित नोकऱ्यांमध्ये (Jobs) प्रचंड अनिश्चितता निर्माण होणार असल्याचा इशारा आर्थिक पाहणी अहवालात देण्यात आला आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.

Budget Income Tax: अर्थसंकल्पात सामान्य नोकरदारांना काय मिळणार? उत्पन्नावर किती टक्के टॅक्स लागणार? गृहकर्ज घेणाऱ्यांना फायदा होणार?

एनडीए सरकारच्या पहिल्यावहिल्या अर्थसंकल्पात Income Tax Slab मध्ये काही बदल होऊ शकतात. मध्यमवर्गीय आणि सामान्य नोकरदारांना दिलासा देण्याच्यादृष्टीने उत्पन्नानुसार आकारण्यात येणाऱ्या आयकराच्या टक्केवारीत महत्त्वाचे फेरबदल होऊ शकतात. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.

Union Budget 2024 LIVE : अर्थसंकल्पातून सामन्याला काहीही मिळत नाही, भांडवलदारांच्या हिताचे निर्णय घेतले जातायत- के सुरेश

अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाआधी काँग्रेसने मोदी सरकारवर टीका केली आहे. याआधीचा अर्थसंकल्प हा लोकहिताचा नव्हता. गरिबांना भेडसावत असलेली बेरोजगारी, महागाई यावर सरकार काम करत नाहीये, असं अर्थिक सर्वेक्षण अहवालातही सांगण्यात आलंय. सामान्य माणसाला अर्थसंकल्पातून काहीही मिळत नाहीये. हे सरकार भांडवलदारांचे सरक्षण करत आहे, अशी टीका काँग्रेसचे खासदार के सुरेश यांनी केली.





Union Budget 2024 : अर्थसंकल्पाच्या प्रती संसदेत आल्या, काही क्षणात अर्थसंकल्प सादर होणार

अर्थसंकल्पाच्या प्रती संसदेत आल्या आहेत. आता लवकरच अर्थसंकल्प सादर केला जाईल. 





Amit Shah : अमित शाह संसदेत पोहोचले

पुढच्या काही मिनिटांत संसदेत अर्थसंकल्पस सादर केला जाणार आहे. त्यासाठी मोदी सरकारचे सर्व मंत्री उपस्थित राहणार आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील संसदेच्या परिसरात पोहोचले आहेत. 





Union Budget 2024 : निर्मला सीतारामन संसदेत पोहोचल्या, काही क्षणात सादर होणार अर्थसंकल्प!

अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत पोहोचल्या आहेत. त्या पुढच्या काही क्षणात अर्थसंकल्प सादर करणार आहेत.





Budget 2024 LIVE : निर्मला सीतारामन यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट, लवकरच संसदेकडे रवाना होणार

अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. लवकरच त्या संसदेत जातील. 





Niramala Sitharaman : निर्मला सीतारामन अर्थमंत्रालयातून निघाल्या, काही क्षणांत संसदेत पोहोचणार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अवघ्या काही तासांत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पाची बॅग घेऊन  निर्मला सीतारामन संसदेच्या दिशेने निघाल्या आहेत. त्या अर्थमंत्रालयातून बाहेर पडल्या आहेत. त्यांच्यासोबत अर्थमंत्रालयातील अधिकारीही आहेत.    

Niramala Sitharaman : निर्मला सीतारामन अर्थमंत्रालयातून निघाल्या, काही क्षणांत संसदेत पोहोचणार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अवघ्या काही तासांत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पाची बॅग घेऊन  निर्मला सीतारामन संसदेच्या दिशेने निघाल्या आहेत. त्या अर्थमंत्रालयातून बाहेर पडल्या आहेत. त्यांच्यासोबत अर्थमंत्रालयातील अधिकारीही आहेत.    

Union Budget 2024 : संसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू यांच्याकडून सीतारमन यांना सुभेच्छा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सकाळी 11 वाजता त्या संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. 





Union Budget 2024 : अर्थसंकल्पात महिलांसाठी होणार भरीव तरतूद?

मिळालेल्या माहितीनुसार सरकार अर्तसंकल्पात महिलांसाठी मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. लखपती दीदी आणि लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे. देशात तीन कोटी लखपती दीदी करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.  सध्या या योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमहिना 1500 रुपायांची मदत मिळते.

Union Budget 2024 : एबीपी माझावर अर्थसंकल्प सोप्या भाषेत

अर्थसंकल्पाची प्रत्येक अपडेट तुम्हाला एबीपी माझाच्या टीव्ही चॅनेलवरही पाहता येईल. 


Budget 2024 LIVE : लवकरच निर्मला सीतारीमन अर्थसंकल्प सादर करणार

निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. 





Union Budget 2024 Live Updates : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय? सर्वांना उत्सुकता

मोदी 3.0 सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात काय घोषणा होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. निर्मला सीतारामन यांनी 22 जुलै रोजी संसदेत देशाचा आर्थिक पाहणी अहवाल मांडला. या आर्थिक पाहणी अहवालात कृषी क्षेत्रात तातडीने सुधारणा होणे गरजेचे आहे, असे सूचवण्यात आले आहे. त्यामुळे यावेळच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय असणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. 

Union Budget 2024 Live Update : निर्मला सीतारामन सातव्यांदा सादर करणार अर्थसंकल्प

अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याआधी फेब्रुवारी महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळीही सरकारने अनेक घोषणा केल्या होत्या. आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात फेब्रुवारी महिन्यात सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पाची छाप असणार की अन्य नव्या योजनांची, तरतुदींची घोषणा केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Union Budget 2024 Live : आज अर्थसंकल्प, कोणासाठी काय तरुतदी? सर्वांचे लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज (23 जुलै) संसदेत सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प सादर करतील. आजच्या अर्थसंकल्पात नेमके काय असणार? कोणत्या भागासाठी काय तरतुदी असतील? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.  

पार्श्वभूमी

Union Budget 2024 Live Updates : केंद्रात नरेंद्र मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर आज अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्या पोतडीतून अनेक नव्या योजना जाहीर करण्यात आल्या. 


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या मागील कार्यकाळात तीन पूर्ण अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प पेपरलेस पद्धतीने सादर केला आहे आणि यावेळीही त्यांनी पेपरलेस बजेट सादर केलं. अर्थसंकल्पीय दस्तऐवजांमध्ये वार्षिक आर्थिक विवरण, अनुदानाची मागणी आणि वित्त विधेयक केंद्रीय अर्थसंकल्प मोबाईल ॲपमध्ये पाहिले जाऊ शकते. अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण  Android आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर 'Union Budget Mobile App' वर उपलब्ध होईल. बजेट दस्तऐवज ॲपवर हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. हे ॲप www.indiabudget.gov.in वरूनही डाउनलोड करता येईल.


India Budget 2024 LIVE updates in Marathi : तळघरात बंद अधिकाऱ्यांची आज सुटका


अर्थसंकल्प तयार केल्यानंतर, अर्थमंत्र्यांच्या संमतीने अर्थसंकल्पाशी संबंधित कागदपत्रे अर्थ मंत्रालयाच्या तळघरातील बजेट प्रेसकडे पाठविली जातात. बजेट दस्तऐवज अत्यंत संवेदनशील आणि गोपनीय आहे. गोपनीय कागदपत्रे लीक होऊ नयेत, यासाठी अर्थसंकल्पीय कागदपत्रांच्या छपाईच्या वेळी अर्थ मंत्रालयाचे 100 हून अधिक कर्मचारी अर्थसंकल्पीय कागदपत्रांच्या छपाईसाठी तळघरात राहतात आणि ते बजेट सादर होईपर्यंत बाहेर पडू शकत नाहीत. आता अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्या अधिकाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.