New Delhi Railway Station Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री (15 फेब्रुवारी) घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर (New Delhi Railway Station Stampede) प्लॅटफॉर्म नंबर 14 आणि 16 मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 18 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच, अनेक लोक जखमी  झाले आहेत. जखमी झालेल्या रुग्णांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्यथेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींची केला शोक व्यक्त 

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीमुळे मी व्यथित झालो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले, त्यांच्याप्रती माझी मनापासून सहानुभूती आहे,असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

रेल्वे मंत्र्यांनी केलं ट्वीट

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावर सांगितले की, "नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे मोठा धक्का बसला आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्या कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. संपूर्ण टीम अपघातग्रस्त लोकांना मदत करत आहे." या घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली.

नेमकं काय घडलं?

घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास दिल्ली रेल्वे स्थानकावर अचानक गडबड गोंधळ झाला. या दरम्यान प्रयागराज एक्सप्रेस आणि मगध एक्सप्रेस रेल्वेने जाण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवाशांची गर्दी जमा झाली होती. या दरम्यान, अचानक रात्री साडे आठ ते नऊ वाजताच्या सुमारास प्रयागराजला जाण्यासाठी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. प्रत्येकाला ट्रेनमध्ये जागा हवी होती. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे पकडण्यासाठी गर्दी इतकी होती की तिकीट असणाऱ्यांना देखील जागा मिळाली नाही. यामुळेच चेंगराचेंगरी होऊन ही दुर्घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

हे ही वाचा : 

New Delhi Railway Station Stampede: धावाधाव, आरडाओरड अन् किंकाळ्या...; नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत 18 जणांनी गमावला जीव, हादरवणारे PHOTO