Harshvardhan Sapkal on Suresh Dhas & Dhananjay Munde : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर (Santosh Deshmukh Murder Case) मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) हे गेला काही दिवसांपासून जोरदार हल्लाबोल करत आहेत. त्यातच सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची  गुप्त भेट घेतल्याची माहिती समोर आली. यानंतर सुरेश धस यांच्यावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केलाय. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी धनंजय मुंडे आणि सुरेश धस भेटीवर निशाणा साधलाय. धस-मुंडे भेट ही टीआरपीसाठी घडवून आणलेली घटना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट म्हणजे टीआरपी वाढवण्यासाठीचे हे प्रकरण होतं. कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्व कमी करण्यासाठी भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी सुरेश धस यांना सूचना दिली होती. त्यच्या पलीकडे जाऊन पाहिले तर आका, बंदूक, रेती, टिप्पर, असे शब्द रांगड्या भाषेत मांडले जात होते. मात्र आता हे शब्द मागे पडलेत आणि आता "मांडवली, मांडवली, आणि मांडवली" या शब्दाची गुंज या प्रकरणातून ऐकू येतेय, असे म्हणत त्यांनी मुंडे- धस भेटीवर निशाणा साधलाय.


काय म्हणाले सुरेश धस? 


सुरेश धस यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटलंय की, धनंजय देशमुख आणि मस्साजोगचे नागरिक माझ्यासोबत आहेत. मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा भूमिका माझ्यासोबतच राहील. हे पेल्यामधले वादळ आहे. एक दोन दिवसांमध्ये शांत होऊन जाईल. आमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितले की, सुरेश धस त्यांच्या म्हणण्यावर ठाम राहिले आहेत. मी आजही ठाम आहे, उद्याही राहील आणि जोपर्यंत या आरोपींना फाशी होणार नाही तोपर्यंत मी ठाम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. जर कुणाच्या मनाला ठोस पोहोचले असेल तर ती काढून टाका, या प्रकरणात शेवटपर्यंत लढा मी देणारच आहे. कुणीतरी अतिशय व्यवस्थितपणे यामध्ये षडयंत्र रचले आहे. हे सगळं षडयंत्र मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे. ज्यांनी षडयंत्र रचले आहे त्यांचा मी बंदोबस्त करणार आहे, असे सुरेश धस यांनी म्हटले. 



आणखी वाचा 


... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा


धस - मुंडे ही जय वीरूची जोडी ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेहबूब शेख यांचा टोला ; म्हणाले, 'त्यांचा दोस्ताना जुनाच'