कर्जबुडव्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला ब्रिटन सरकारची परवानगी
ब्रिटनचे गृहसचिव साजिद जाविद यांनी कर्जबुलव्या विजय मल्लाच्या प्रत्यार्पणाची परवानगी दिली आहे. भारतीय बँकांचे 9 हजार कोटींचे कर्ज बुडवून मल्ला पसार झाला आहे.

लंडन : भारतीय बँकांचे 9 हजार कोटींचे कर्ज बुडवून पळालेल्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाबाबत भारत सरकारला मोठं यश मिळालं आहे. ब्रिटनच्या गृहसचिवांनी मल्ल्यांच्या प्रत्यार्पणाच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. दरम्यान, मल्ल्याला अपील करण्यासाठी 14 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
ब्रिटनचे गृहसचिव साजिद जाविद यांनी कर्जबुलव्या विजय मल्लाच्या प्रत्यार्पणाची परवानगी दिली आहे. काही दिवसांपूर्वीचं मल्ल्याला मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टानं 'फरार आर्थिक गुन्हेगार' म्हणून घोषित केलं आहे.
किंगफिशर एअरलाइन्स’च्या नावे घेतलेली बँकांची सुमारे 9,000 हजार कोटी रुपयांची कर्ज बुडवून विजय मल्ल्या इंग्लंडमध्ये पसार झाला आहे. मल्ल्या देशाबाहेर पळून गेल्याने भारत सरकारची मोठी नाचक्की झाली आहे. तेव्हापासून मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडून सातत्याने प्रयत्न सुरु होते.
विजय मल्ल्यावर 16 बँकांच 9000 कोटींच कर्ज
- स्टेट बँक ऑफ इंडिया - 1600 कोटी
- पंजाब नॅशनल बँक - 800 कोटी
- आईडीबीआई बँक - 800 कोटी
- बँक ऑफ इंडिया - 650 करोड़
- बँक ऑफ बडोदा - 550 कोटी
- यूनाइटेड बँक ऑफ इंडिया - 430 कोटी
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया - 410 कोटी
- यूको बँक - 320 कोटी
- कॉर्पोरेशन बँक ऑफ इंडिया - 310 कोटी
- सेंट्रल बँक ऑफ मैसूर - 150 कोटी
- इंडियन ओवरसीज़ बँक - 140 कोटी
- फेडरल बँक - 90 कोटी
- पंजाब सिंध बँक - 60 कोटी
- एक्सिस बँक - 50 कोटी
Before You Go
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप






















