एक्स्प्लोर

Delhi Violence: लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा लावणाऱ्यांविरोधात देशद्रोह आणि UAPA अंतर्गत गुन्हा

Delhi Violence: लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा लावणाऱ्या आणि गोंधळ घालणाऱ्यांविरोधात देशद्रोह आणि UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाची चौकशी दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल करणार आहे.

नवी दिल्ली: लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा लावणाऱ्या आणि गोंधळ घालणाऱ्यांविरोधात देशद्रोह आणि UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाची चौकशी दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल करणार आहे. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, दिल्ली पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये होऊ शकणाऱ्या सहमतीला नजरअंदाज करण्याची योजना आधीच आखण्यात आली होती, ज्यामुळं प्रजासत्ताक दिनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सरकारला बदनामी होईल.

नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचार झाला होता. आंदोलकांनी लाल किल्ल्यात घुसुन तिथं ध्वजस्तंभावर धार्मिक झेंडा लावला होता. दिल्ली पोलिसांनी जानेवारी रोजी झालेल्या या प्रकरणी आतापर्यंत 33 एफआयआर दाखल केल्या आहेत. यात राकेश टिकैत, योगेंद्र यादव आणि मेधा पाटकर यांच्यासह 37 शेतकरी नेत्यांची नावं आहेत. या सर्वांविरोधात दंगल भडकवणे, गुन्हेगारी षडयंत्र, हत्येचा प्रयत्न असे विविध आरोप लावण्यात आले आहेत.

Farmer Tractor Rally Violence : दिल्ली हिंसाचारप्रकरणी योगेंद्र यादव यांच्यासह 26 जणांवर गुन्हे दाखल

शेतकरी नेत्यांविरोधात गुन्हे दाखल ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचाराबद्दल बर्‍याच दिल्ली पोलिसांनी अनेक शेतकरी नेत्यांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत. दिल्ली पोलिसांच्या एफआयआरमध्ये योगेंद्र यादव यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यांच्याशिवाय राकेश टिकैत, सरवनसिंग पंढेर आणि सतनामसिंग पन्नू यांचीही नावं एफआयआरमध्ये नाव आहे. या नेत्यांव्यतिरिक्त पंजाबी अभिनेता आणि गायक दीप सिद्धू आणि लखबीरसिंग उर्फ ​​लखा सिधाना हे देखील दिल्ली पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 37 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. शेतकरी नेत्यांविरोधात विविध कलमांर्तगत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 93 जणांना अटक केल्याचं बोललं जात आहे. तर 200 लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या हिंसाचाराबद्दल दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये असा आरोप केला जात आहे की पोलिसांनी ट्रॅक्टर रॅलीसाठी जारी केलेल्या एनओसीचे पालन केले गेले नाही.

Exclusive : '26 जानेवारीला झालं ते अयोग्य, आम्ही दिलेल्या ताकतीचा चुकीचा वापर' : शेतकरी नेते व्ही.एम सिंह

गुन्हे दाखल झालेल्या नेत्यांची नावं

आंदोलनात सहभागी झालेल्या जवळपास सर्व नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर, स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव, जममुरी किसान सभा पंजाबचे कुलवंतसिंग संधू, भारतीय किसान सभा डकोडाचे बुटा सिंग यांचा समावेश आहे. कवणलप्रीतसिंग पन्नू, किसान मजदूर संघर्ष समिती सतनामसिंह पन्नू, सुरजितसिंग फूल, जोगिंदरसिंग हरमीतसिंग कादियन, बलवीरसिंग राजेवाल, सतनामसिंग साहनी, डॉ. दर्शन पाल, भगबसिंग मनसा बलविंदर लिओ ओलाक, सतनामसिंग भेरू, बुटासिंग शादिपुर, बलदेवसिंग सिरसा, जगबीरसिंग ताडा, मुकेश चंद्र, सुखपालसिंग दाफर, हरपाल सांगा, कृपालसिंग नटूवाला, राकेश टिकैत, कविता, ऋषी पाल अंबावता, व्हीएम सिंग, प्रेमसिंग गहलोत यांची नावं एफआयआरमध्ये आहेत. गुन्हेगारी कट रचणे, दरोडा, दरोड्याच्या वेळी प्राणघातक शस्त्राचा वापर, खुनाचा प्रयत्न करण्यासारख्या गंभीर कलमांसह एकूण 13 कलमांर्तगत ही कारवाई करण्यात आली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget