एक्स्प्लोर
'..माझ्या बॉसला चोप द्या,' ट्विटर युझरकडून इंडिगोची फिरकी
इंडिगो एअरलाईन्सला केलेला असाच एक ट्वीट सोशल मीडियावर तुफान गाजत आहे. एका व्यक्तीने ट्वीट करुन इंडिगोकडे मदत मागितली आहे.
मुंबई : कर्मचाऱ्याने प्रवाशाला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानतंर सोशल मीडियावर नेटीझन्स इंडिगो एअरलाईन्सची फिरकी घेत आहेत. काहींनी इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांवर टीका केली आहे, तर काही जण ट्विटरवर त्यांची थट्टा करत आहेत.
इंडिगो एअरलाईन्सला केलेला असाच एक ट्वीट सोशल मीडियावर तुफान गाजत आहे. एका व्यक्तीने ट्वीट करुन इंडिगोकडे मदत मागितली आहे. यानंतर इंडिगोने तुम्हाला काय मदत हवी, अशी विचारणा केल्यानंतर संबंधित व्यक्तीने दिलेलं उत्तर व्हायरल झालं आहे.
https://twitter.com/rohitchoube/status/928028891536609280
रोहित चौबे नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर इंडिगोला उद्देशून लिहिलं आहे की, "माझा बॉस 3 वाजताच्या विमानाने दिल्ली येत आहे...तो उतरला की त्याला चांगला चोप द्या."
https://twitter.com/rohitchoube/status/928163729371475968
हे ट्वीट व्हॉट्सअॅप, फेसबुकसह ट्विटरवर तुफान शेअर केलं जात आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हे ट्वीट शेअर आणि लाईक केलं आहे. तर शेकडो वेळा रिट्वीटही करण्यात आलं आहे.
इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्याने एका प्रवाशाला मारहाण केल्याचा व्हिडीओ 7 नोव्हेंबर रोजी व्हायरल झाला होता. 15 ऑक्टोबर, 2017 रोजी चा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कंपनीने प्रवाशाची माफी मागितली.
यानंतर एअरइंडिया, जेट एअरवेजसह अनेक डोमेस्टिक एअरलाईन्स कंपन्यांनीही ट्विटरवर इंडिगोची फिरकी घेण्याची संधी सोडली नाही.
संबंधित बातम्या
इंडिगो मारहाण प्रकरणानंतर एअर इंडियाची कल्पक कुरघोडी
प्रवाशाला मारहाण करणाऱ्या इंडिगो कर्मचाऱ्याची हकालपट्टी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement