टीआरपी घोटाळा प्रकरण मुंबई पोलिसांकडून काढून सीबीआयला सोपवण्याचा प्रयत्न? लखनौमधील तपास सीबीआय करणार
अलीकडच्या काळात टीआरपीवरील आरोपांबाबत सरकारने मोठ्या प्रमाणात चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ही एफआयआर दाखल करण्याची आली आहे.
मुंबई : लखनौच्या हजरतगंज पोलिस स्टेशनमध्ये टीआरपीप्रकरणी दाखल एफआयआरचा तपास आता सीबीआय करणार आहे. डीओपीटीच्या सूचनेनंतर सीबीआयने दिल्लीत गुन्हा दाखल केला आहे. टीआरपी घोटाळ्याबाबत आणखी एफआयआर नोंदविण्यात आली आहे. लखनौच्या हजरतगंज पोलिस स्टेशनमध्ये ही एफआयआर नोंदविला.
उत्तर प्रदेश सरकारने तपासासाठी सीबीआयला शिफारस केली होती. उत्तर प्रदेशच्या गृह विभागाने सीबीआयला चौकशीसाठी एक शिफारस पत्र पाठवले होते. त्यामुळे हे प्रकरण मुंबई पोलिसांकडून काढून सीबीआयच्या हातात सोपवण्याचा प्रयत्न होत आहे का? असा सवाल विचारले जात आहे. सध्या या प्रकरणात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये कोणालाही थेट आरोपी करण्यात आले नाही. अलीकडच्या काळात टीआरपीवरील आरोपांबाबत सरकारने मोठ्या प्रमाणात चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ही एफआयआर दाखल करण्याची आली आहे.
काही दिवसांपूर्वी बनावट टीआरपी रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली होती. BARC ही संस्था टीआरपी मोजण्याचे काम देशात करते. ही संस्था वेगवेगळ्या शहरात बॅरोमीटर लावते, देशात सुमारे 30 हजार बॅरोमीटर लावण्यात आले आहेत. मुंबईत सुमारे 10 हजार बॅरोमीटर बसविण्यात आले आहेत. बॅरोमीटर बसवण्याचे काम मुंबईतील हंसा नावाच्या संस्थेला देण्यात आले होते. तपासादरम्यान हंसांसोबत काम करणारे काही जुने कामगार टेलिव्हिजन वाहिनीवरून डेटा शेअर करत असल्याचे उघड झाले आहे. हे कामगार लोकांना घरात विशिष्ट चॅनल सुरु ठेवण्यासाठी पैसे द्यायचे. जे लोक अशिक्षित आहेत त्यांच्या घरी इंग्रजी चॅनेल पाहिले जात असल्याची माहिती आहे, असं मुंबई पोलीस आयुक्तांनी सांगितलं होतं.
संबंधित बातम्या