एक्स्प्लोर

व्हायरल सत्य : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या 'या' फोटोमागचं सत्य काय?

ज्या बाईकस्वारासमोर पोलिस अधिकारी शलभ कुमारांनी हात जोडले आहेत, त्याचं नाव हनुमंत नायडू आहे.

मुंबई : आंध्र प्रदेशातील एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोत बाईकवर एक व्यक्ती दोन महिला आणि दोन मुलांसोबत बसली आहे. तर समोर एक पोलिस अधिकारी या बाईकस्वारासमोर हात जोडून उभा आहे. आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथील ही घटना आहे. या फोटोतील आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, बाईकवर बसलेल्या कुणीच हेल्मेट घातले नाही. कर्नाटक कॅडरचे आयपीएस अधिकारी अभिषेक गोयल यांनी हा फोटो ट्विटरवर पोस्ट करत लिहिले आहे की, "बाईकस्वारासमोर हात जोडण्यापलिकडे पोलिस अधिकारी काय करु शकतो?" अभिषेक गोयल यांचं हे ट्वीट 7 हजारांहून अधिक जणांनी लाईक आणि 4 हजारांहून अधिक जणांनी रिट्विट केले आहे. बाईकस्वारासमोर हात जोडून असणाऱ्या या पोलिस अधिकाऱ्याचं नाव शलभ कुमार असल्याची माहिती मिळते आहे. शलभ कुमार हे अनंतपूरच्या मडाकसारियामध्ये पोलिस अधिकारी आहेत. आणखी विशेष म्हणजे, या घटनेआधी काही तास रोड सेफ्टीसंदर्भात एक कार्यक्रम पोलिस अधिकारी शलभ कुमार यांनी केला होती. त्या कार्यक्रमात हे कुटुंबही हजर होते. ज्या बाईकस्वारासमोर पोलिस अधिकारी शलभ कुमारांनी हात जोडले आहेत, त्याचं नाव हनुमंत नायडू आहे. शलभ कुमार यासंदर्भात बोलताना म्हणाले, "जेव्हा मी बाईकवर पाच जण बसल्याचे पाहिले, त्यावेळी मला प्रचंड राग आला. मात्र मी हतबल झालो आणि त्यांच्यासमोर केवळ हात जोडले. कारण मी तेच करु शकत होतो." पोलिस अधिकारी शलभ कुमार यांनी बाईकस्वार हनुमंत नायडू यांच्यासमोर हात जोडले. त्यावेळी हनुमंत नायडू हे हसत होते. https://twitter.com/goyal_abhei/status/917563520639655936

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस
Maharashtra Live News Updates: दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस
PoK Protest : ज्या पाकव्याप्त काश्मीरसाठी अमित शाहांनी शपथ घेतली, तो भारताला परत मिळणार? पाकिस्तानविरोधात मोठा उद्रेक
ज्या पाकव्याप्त काश्मीरसाठी अमित शाहांनी शपथ घेतली, तो भारताला परत मिळणार? पाकिस्तानविरोधात मोठा उद्रेक
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई

व्हिडीओ

NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
Embed widget