एक्स्प्लोर

मुस्लिम लॉ बोर्ड घटनेपेक्षा मोठं नाही, तोंडी तलाक क्रूरपणा: अलाहाबाद हायकोर्ट

अलाहाबाद: तोंडी तलाकच्या मुद्द्यावर अलाहाबाद कोर्टानं मोठा निर्णय सुनावला आहे. 'मुस्लिम लॉ बोर्ड घटनेपेक्षा मोठं नाही, मुस्लिम महिलांना तोंडी तलाक देण्याची पद्धत ही क्रूर असून त्यामुळे महिलांच्या घटनात्मक अधिकारांवर गदा येत आहे.' असं हायकोर्टान म्हटलं आहे. अलाहाबाद कोर्टानं आपला निर्णय सुनावताना कुराणाचाही दाखला दिला आहे. 'पवित्र कुराणमध्येही तोंडी तलाक चांगलं मानण्यात आलेलं नाही. मुस्लीम समाजाचा एक वर्ग इस्लामिक कायद्याचा चुकीचा अर्थ लावत आहे.' असं कोर्टानं म्हटलं आहे. दोन वेगवेगळ्या याचिकांमध्ये न्यायमूर्ती सुनीत कुमार यांनी हा निर्णय दिला आहे. या निर्णयाचा काय परिणाम होऊ शकतो? अलाहाबाद हायकोर्टाच्या या निर्णयानंतर तोंडी तलाकचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येऊ शकतो. मागील काही दिवसांपासून तोंडी तलाकच्या बदलाला मुस्लिम समाजातील एका गटाकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे. तोंडी तलाक हा त्यांच्या शरीयतचा भाग असून त्यात बदल करण्याचा अधिकार कोणालाही नाही. असं काही जणांचं म्हणणं आहे. तोंडी तलाकविरुद्ध काही महिलांनीही सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे.  केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात बाजू मांडताना म्हटलं आहे की, तोंडी तलाक हा लैंगिक न्याय, समानता आणि संविधानाविरुद्ध आहे. दुसरीकडे विधी आयोगानं ज्या 11 प्रश्नांवर सामान्य लोकांची उत्तरं मागितली आहेत त्यामध्ये तोंडी तलाकचा प्रश्नाचाही समावेश आहे. विधी आयोगाच्या या प्रश्नानंतर मुस्लिम समाजानं तोंडी तलाकचा विरोध केला होता. दरम्यान, तोंडी तलाक हा मुद्दा मुस्लिम समाजात अतिशय संवेदनशील आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने मात्र, या तोंडी तलाक पद्धतीचं समर्थन केलं आहे. बोर्डाचं म्हणणं आहे की, हा प्रश्न धार्मिक अधिकारात येतो. त्याला कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकत नाही. पण काही महिला संघटनांनी तोंडी तलाक पद्धतीला विरोध केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget