एक्स्प्लोर
उद्घाटनाआधीच ट्रेन18 च्या काचा फोडल्या
दिल्ली ते आग्रा दरम्यान चाचणीच्या वेळी अज्ञाताने दगड फेकून मारल्याने या गाडीचा काच फुटला आहे. या गाडीची चाचणी घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी ही गोष्ट ट्विट करुन सांगितली आहे. या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

मुंबई: भारताची इंजिनविना धावणारी पहिली ट्रेन 18 च्या दिल्ली ते आग्रा दरम्यान चाचणीच्या वेळी अज्ञाताने दगड फेकून मारल्याने या गाडीचा काच फुटला आहे. या गाडीची चाचणी घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी ही गोष्ट ट्विट करुन सांगितली आहे. या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे. चेन्नईच्या आयसीएफमध्ये दिवस रात्र मेहनत करून ही ट्रेन बनवली गेली आहे. ही पहिली भारतीय ट्रेन असेल, जी जागतिक दर्जा आणि 180 च्या वेगाने धावेल. तसेच इंजिनविना धावणारी ही गाडी असणार आहे. मात्र चाचणी दरम्यानच 180 च्या स्पीडला असताना कोणीतरी दगड मारल्याने या गाडीचे नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 डिसेंबर रोजी ट्रेन 18 या गाडीला हिरवी झेंडी दाखवणार आहेत. त्यानंतर या गाडीची सेवा प्रवाशांसाठी सुरु होईल. मात्र त्यापूर्वीच गाडीवर माथेफेरुने दगड मारल्याने संताप व्यक्त केला जात आहे. टी-18 रेल्वेतील वैशिष्ट्ये
- एअरो डायनॅमिक शैलीत बनवलेल्या या ट्रेनचा पुढील भाग बुलेट ट्रेन सारखा आहे.
- या रेल्वेत इंजिन नसून ड्रायव्हर कॅब असणार आहे.
- ड्रायव्हर कॅबचा कोच मिळून एकूण 16 डब्ब्याची ही रेल्वे असणार आहे, जे पूर्णपणे वातानुकूलित असतील.
- या सर्व डब्यात स्लायडिंग दरवाजे असतील, जे रेल्वे थांबल्यावर मेट्रो ट्रेनसारखे आपोआप उघडतील.
- तसेच ही रेल्वे प्रतितास 160 किमी धावेल. शिवाय त्यात वाय फायची सुविधा ही असेल.
- मेक इन इंडिया या योजनेअंतर्गत चेन्नईच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये ही रेल्वे बनवण्यात आली आहे.
- ही ट्रेन 18 महिन्यात तयार झाली आहे.
- ही रेल्वे बनवण्यासाठी 100 कोटी खर्च आला आहे.
- पुढील एक ते दीड महिने मुरादाबाद-सहारनपूर मार्गावर चाचणी होईल.
- या वर्षअखेरीस प्रवाशांसाठी रेल्वे रुळावर धावण्याची शक्यता.
आणखी वाचा























