एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'ट्राय'चं नवं केबल धोरण 31 जानेवारीपासून लागू होणार
टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडिया (ट्राय) चा ग्राहकांना पसंतीचे टीव्ही चॅनेल्स निवडण्याचे स्वातंत्र्य देणारं ट्रायचं नवं केबल धोरण आता 29 डिसेंबर ऐवजी 31 जानेवारीपासून लागू करण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडियाचं (ट्राय) ग्राहकांना पसंतीचे टीव्ही चॅनेल्स निवडण्याचे स्वातंत्र्य देणारं नवं केबल धोरण आता 29 डिसेंबर ऐवजी 31 जानेवारीपासून लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या आवडीचे चॅनल निवडण्यासाठी आता महिन्याभराचा वेळ मिळणार आहे.
गुरुवारी ट्राय(TRAI) आणि ब्रॉडकास्टर्स, डीटीएच ऑपरेटर यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. ट्रायच्या नव्या नियमानूसार ग्राहकांना जे चॅनेल्स पाहायचे आहेत केवळ त्याचेच पैसे द्यावे लागणार आहेत. ग्राहकांच्या फायद्याची ही नवी नियमावली लागू करताना त्यांना आपल्या पसंतीचे चॅनल निवडण्यासाठी वेळ मिळावा यासाठी तारीख पुढे ढकलण्यात आल्याची माहिती ट्रायचे सचिव एस. के. गुप्ता यांनी दिली.
यापूर्वी ट्रायची नवी नियमावली 29 डिसेंबरपासून लागू करण्यात येणार होती. परंतू आपल्या पसंतीचे चॅनल निवडायचे कसे याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम होता. या नव्या नियमांमुळे ग्राहकांचे टीव्ही पाहणे खूप स्वस्त होणार असल्याचे ट्रायचे म्हणणे आहे.
संबंधित बातम्या :
29 डिसेंबरनंतर तुमचं टीव्ही पाहणं स्वस्त होणार की महाग?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्राईम
निवडणूक
Advertisement