एक्स्प्लोर
Advertisement
गोव्यातील तरुणाचा वसईच्या पर्यटकांच्या बसवर सशस्त्र हल्ला
पणजी : गोव्यात महाराष्ट्रातील वसईतून आलेल्या पर्यटकांच्या बसवर स्थानिकांनी सशस्त्र हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही टवाळ तरुणांनी बसची तोडफोड करत पर्यटकांना जखमी केलं. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.
मुंबईहून एक खाजगी पर्यटक बस 60 जणांसह गोवा दर्शनासाठी आली होती. हे पर्यटक बुधवारी सकाळी मेरशीतील एका हॉटेलमध्ये न्याहारीसाठी थांबले होते. याच हॉटेलमध्ये एक स्थानिक युवक न्याहारीसाठी बसला होता. यावेळी पर्यटकांपैकी एका वृद्धाचा हात चुकून संबंधित युवकाला लागला.
या प्रकारामुळे संतापलेल्या युवकाने वृद्धाला मारहाण करण्यास सुरुवात केली. वृद्धासोबत असलेल्या पर्यटक महिलांनी युवकाला फटके देऊन वृद्धाची सुटका केली. त्यानंतर युवक हॉटेलमधून निघून गेला.
पर्यटक बसने पुढे निघाले, इतक्यात त्या युवकाने आपले साथीदार आणि दुकानदारांसोबत येऊन बस अडवली. तलवार, कोयते आणि दांडे घेऊन त्याने बस आणि पर्यटकांवर जोरदार हल्ला चढवला. यामध्ये बसमधील महिला आणि लहान मुलंही जखमी झाली.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पर्यटकांना सुरक्षा दिली. मात्र घटनेची माहिती मिळाल्यानंतरही पोलिस 45 मिनिटं उशिरा पोहचल्याचा आरोप पर्यटकांनी केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. विशाल गोलतेकर (वय 30), सोनम शेट्ये (वय 40) आणि लॉरेन्स डायस (वय 34) यांना अटक केली आहे, तर एक जण फरार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement