एक्स्प्लोर
रक्षाबंधनासाठी बहिणीला 'टॉयलेट' गिफ्ट, यूपीतील मुलाचा अनोखा निर्णय
यूपीत बहिणीला रक्षाबंधनासाठी एका भावानं टॉयलेट गिफ्ट दिलं आहे.
लखनऊ : देशभरात उद्या रक्षाबंधन साजरं केलं जाणार आहे. रक्षाबंधनादिवशी आपल्या बहिणीला अनोखं गिफ्ट देण्याचा सर्वच भावांचा प्रयत्न असतो. यूपीमधील एका मुलानं आपल्या बहिणीला चक्क टॉयलेट गिफ्ट दिलं आहे. 'राखी शौचालय' असं या टॉयलेटला नाव देण्यात आलं असून त्याला फुग्यांनी सजवण्यातही आलं आहे.
उत्तरप्रदेशच्या गोंडा जिल्ह्यातील रुद्रगढ नौसी गावातील एका मुलानं आपल्या बहिणीला चक्क टॉयलेट गिफ्ट दिलं आहे. आपल्या घरी शौचालय नसल्यामुळे बहिणीला त्रास सहन करावा लागतो, आपण ते पाहू शकत नाही, त्यामुळे आपण बहिणीला हे गिफ्ट दिल्याचं मुलानं सांगितलं.
बहिणीला टॉयलेट गिफ्ट देण्याची निर्णय घेतल्यानंतर मोठ्या कष्टानं आपण 15 हजारांची जमवाजमव केली. माझ्यासारख्या व्यक्तीसाठी ही खूप मोठी रक्कम आहे, असंही तो म्हणाला. दरम्यान यूपीमध्ये अनेक भावांनी आपल्या बहिणीसाठी शौचालय बांधली आहेत. उद्या रक्षाबंधनादिवशी ही शौचालयं बहिणींना भेट दिली जाणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement