Tirupati Stampede : तिरूपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी, चार जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी, दर्शन पास काऊंटरजवळील घटना
Tirupati Balaji Stampede : आंध्र प्रदेशच्या तिरुपती मंदिरात दर्शन पास काऊंटरवर झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली असून त्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला.

Tirupati Balaji Stampede : तिरुपती येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिराच्या वैकुंठ गेटवर बुधवारी दर्शनासाठी टोकन वाटप करताना झालेल्या चेंगराचेंगरीत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर इतर सहा जण गंभीर जखमी झाले. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. तिरुपतीमधील विष्णू निवास आणि रामनायडू शाळेजवळ ही घटना घडली. गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी चेंगराचेंगरीत भाविकांच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री नायडू यांनी या घटनेतील जखमींवर करण्यात येत असलेल्या उपचारांबाबत अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदतकार्य करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून जखमींना चांगले उपचार मिळू शकतील.
Andhra Pradesh CM Chandrababu Naidu expressed his deep shock over the death of 4 devotees in the stampede that took place near Vishnu Niwasam in Tirupati for darshan tokens at Tirumala Srivari Vaikuntha Dwara: Andhra Pradesh CMO https://t.co/NAXv23jyw1
— ANI (@ANI) January 8, 2025
तिरुपती मंदिराच्या वैकुंठ गेटवर दर्शनासाठीचे टोकन घेण्यासाठी भाविकांची गर्दी जमली होती. त्यावेळी ही चेंगराचेंगरी झाली. तिरुमला तिरुपती देवस्थानने 9 डिसेंबरपासून दर्शनासाठी टोकन व्यवस्था सुरू केली आहे. तिरुपती मंदिराच्या 9 केंद्रांमध्ये 94 काउंटरद्वारे वैकुंठ दर्शन टोकन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ते टोकन घेण्यासाठी बुधवारी सायंकाळपासूनच भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
या चेंगराचेंगरीत अनेक भाविक आजारी पडले, काहीजण बेशुद्धही पडल्याची माहिती आहे. जखमी झालेल्या भाविकांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तिरुपती देवस्थान समितीने 10, 11 आणि 12 जानेवारी रोजी वैकुंठ द्वार दर्शनाच्या पहिल्या तीन दिवसांसाठी 1.20 लाख टोकन जारी करण्याचा निर्णय घेतला होता.
#WATCH | Andhra Pradesh | Visuals from outside Sri Venkateswara Ramnarayan Ruia Government General Hospital in Tirupati where the injured of the stampede that occurred at Vishnu Nivasam in Tirupati are admitted.
— ANI (@ANI) January 8, 2025
Four people have lost their lives in the stampede. pic.twitter.com/cpfsKiPx8U
ही बातमी वाचा:























