तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंसाठी जनावरांच्या चरबीचा वापर? मुख्यमंत्री चंद्राबाबूंचा माजी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Tirumala Tirupati Devasthan: तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंवरुन मुख्यमंत्री चंद्राबाबूंचा गंभीर आरोप. पवित्र लाडवात शुद्ध तुपाऐवजी जनावरांच्या चरबीचा वापर, वायएसआर काँग्रेसवर शरसंधान
![तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंसाठी जनावरांच्या चरबीचा वापर? मुख्यमंत्री चंद्राबाबूंचा माजी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप Tirumala Tirupati Devasthanam Use Animal Fat in Prasadam Laddus Serious allegations of CM Chandrababu Naidu Former CM YS Jagan Mohan Reddy Tirupati Temple तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंसाठी जनावरांच्या चरबीचा वापर? मुख्यमंत्री चंद्राबाबूंचा माजी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/19/727ba3c7adedf444a165f0427fe9be0f172671068541188_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Chandrababu Naidu On Tirupati Temple : नवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे (Andhra Pradesh) मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू (N. Chandrababu Naidu) यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या (Tirumala Tirupati Devasthan) प्रसादाबद्दल गंभीर आरोप केला आहे. नायडू यांचे कट्टर विरोधक आणि माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांच्या कार्यकाळात तिरुपतीच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर व्हायचा, असा अतिशय धक्कादायक आरोप नायडू यांनी केला आहे. यामुळे आंध्र प्रदेशमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. कारण तिरुमला तिरुपती देवस्थानाचे लाडू हे अतिशय पवित्र मानले जातात.
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि चंद्राबाबू नायडू यांचे कट्टर विरोधक जगनमोहन रेड्डी यांच्या काळात तिरुपती देवस्थानाच्या वतीनं भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या प्रसादाच्या लाडूंमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंध्रचे मुख्यमंत्री नायडू यांनी तिरुपतीच्या लाडूंबद्दल केलेल्या मोठ्या दाव्यामुळे मोठा गदारोळ माजला आहे. नायडूंच्या दाव्यामुळे आंध्र प्रदेशात मोठा वाद निर्माण झाला आहे.
तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंवरुन मुख्यमंत्री चंद्राबाबू यांनी गंभीर आरोप केला आहे. पवित्र लाडवात शुद्ध तुपाऐवजी जनावरांच्या चरबीचा वापर करण्यात आला आहे. वायएसआर काँग्रेसवर निशाणा साधण्यात आला आहे. शुद्ध तुपाऐवजी त्यांनी प्राण्यांची चरबी वापरली. मात्र, आता शुद्ध तुपाचा वापर केला जात असल्याचंही चंद्राबाबूंनी स्पष्ट केलं आहे. मंदिरातील सर्व काही स्वच्छ करण्यात आलं आहे. यामुळे गुणवत्ता सुधारली आहे, असं देखील चंद्राबाबूंनी स्पष्ट केलं.
तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) द्वारे चालवल्या जाणाऱ्या तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर मंदिरात मागणीनुसार, प्रसादाचे लाडू दिले जातात. एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला संबोधित करताना नायडू यांनी दावा केला की, प्रसाद म्हणून भाविकांना दिले जाणारे तिरुमला प्रसादाचे लाडू निकृष्ट घटकांनी बनवले जातात.
वायएसआर काँग्रेसचा पलटवार
वायएसआर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार वायव्ही सुब्बा रेड्डी यांनी नायडूंवर तिरुमला मंदिराच्या पावित्र्याला हानी पोहोचवल्याचा आरोप केला. रेड्डी यांनी तेलुगू ऑन एक्समध्ये लिहिलं की, चंद्राबाबू नायडू यांनी तिरुमलाच्या पावित्र्याला आणि कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेला गंभीर हानी पोहोचवली आहे. तिरुमला प्रसाद यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या टिप्पण्या अत्यंत दुर्दैवी आहेत. कोणीही असे शब्द बोलू नये किंवा आरोप करू नये.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)