एक्स्प्लोर

Covid-19 Sero Survey: देशातल्या 21.5 टक्के लोकांना कोरोना होऊन गेला, राष्ट्रीय सीरो सर्व्हेचा अहवाल

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने आपला तिसरा राष्ट्रीय सीरो सर्व्हे (national sero-survey) 7 आणि 8 डिसेंबर रोजी पूर्ण केला होता. त्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की देशातील 21.5 टक्के लोकसंख्येला कोरोनाची बाधा होऊन गेली आहे.

नवी दिल्ली: इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आपला तिसरा राष्ट्रीय सीरो सर्व्हे पूर्ण केला असून त्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की देशातल्या 21.5 टक्के लोकसंख्येला कोरोना होऊन गेला आहे. येत्या काळात अजूनही मोठ्या लोकसंख्येवर हा धोका कायम असल्याचं हा अहवाल सांगतोय.

आयसीएमआरने आपला तिसरा सीरो सर्व्हे 7 डिसेंबर आणि 8 डिसेंबर रोजी केला होता. त्यामधून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. ICMR चे डायरेक्टर जनरल डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितलं की, 28,589 लोकसंख्येपैकी 21.4 टक्के लोकांमध्ये कोरोनाची बाधा होऊन गेली आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील 19.1 टक्क्यांच्या तुलनेत शहरी झोपडपट्टीतील 31.7 टक्के लोकसंख्या आणि 26.2 टक्के इतर लोकसंख्येमध्ये कोरोनाचा प्रसार झाल्याचं समोर आलं आहे असंही ICMR चे डायरेक्टर जनरल यांनी सांगितलं.

Corona Virus: येत्या जुलैपर्यंत 25 कोटी भारतीयांचं लसीकरण होणार? सरकारने सुरु केली तयारी

60 वर्षावरील 23.4 टक्के लोकांना कोरोनाची बाधा होऊन गेली आहे तर 7,177 आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी 25.7 टक्के कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं हा अहवाल सांगतोय.

राष्ट्रीय सीरो सर्व्हेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या दरम्यान 21 राज्यांतील 70 जिल्ह्यामधील 700 गावांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला. देशातील कोरोनाच्या परिस्थितीवर आरोग्य मंत्रालयाने एक निवेदन जाहीर केलं आहे. त्यामध्ये असं सांगण्यात आलंय की भारतात कोरोनाचा क्युमुलेटिव्ह पॉझिटिव्ह दर हा 5.42 टक्के आहे. त्यामध्ये सातत्याने घसरण सुरु आहे असंही सांगण्यात येतंय. गेल्या आठवड्यात हा दर केवळ 1.82 टक्के इतका होता. गेल्या तीन आठवड्यात देशातील 47 जिल्ह्यांत कोरोनाची कोणतीही केस समोर आली नाही तर 251 जिल्ह्यांमध्ये कोणताही बळी गेला नाही.

भारतात कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत आहे. येत्या जुलै महिन्यापर्यंत 25 कोटी भारतीयांचे लसीकरण पूर्ण करण्याचं ध्येय असल्याचं केंद्र सरकारने जाहीर केलंय.

Coronavirus Vaccine: जगभरात 10 कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण, भारत पाचव्या स्थानी

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget