एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एनआरसी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत गंभीर त्रुटी, आसाममधील भाजप नेत्याचा पक्षाला घरचा आहेर
गृहमंत्री अमित शाह आणि आसामचे वित्तमंत्री हिमंता बिस्वा शर्मा या दोघांनी एनआरसीबाबत दोन वेगवेगळी वक्तव्ये केल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
नवी दिल्ली : आसाममधील घुसखोरांची माहिती मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार आसाममधील भाजप सरकारने राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (एनआरसी) प्रकल्प हाती घेतला होता. परंतु हा प्रकल्प पूर्णपणे अपयशी ठरल्याचे आसामचे वित्तमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, आजच संसदेत गृहमंत्री अमित शाह म्हणाले की एनआरसी प्रकल्प आसाममध्ये सुरु करण्यात आला होता. त्यांचे चांगले परिणाम समोर आल्यामुळे येत्या काळात हा प्रकल्प संपूर्ण देशभरात राबवला जाणार आहे.
देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि आसामचे वित्तमंत्री हिमंता बिस्वा शर्मा या दोघांनी एनआरसीबाबत दोन वेगवेगळी वक्तव्ये केल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
शर्मा यांनी एनआरसीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, एनआरसीमध्ये अनेक गंभीर त्रुटी आहेत. तसेच अनेक त्रुटी येत्या काळात समोर येतील. एनआरसी प्रकल्प ज्या उद्देशाने सुरु केला होता. तो साध्य होण्याच्या सर्व अपेक्षा मी सोडून दिल्या आहेत. तसेच केंद्र आणि राज्य सरकार घुसखोरांना राज्यातून बाहेर काढण्यात वेगवेगळ्या पद्धतींचा विचार करत आहे.
एनआरसीमधील अनेक त्रुटी आम्ही समोर आणल्या आहेत. तसेच विविध सामाजिक संघटनांनी त्याविरोधात सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल केल्या आहेत. आसाममधील सध्याचा एनआरसी प्रकल्प रद्द करावा, तसेच आसाममध्ये राष्ट्रीय एनआरसी प्रकल्प सुरु करुन नागरिक आणि घुसखोरांची माहिती मिळवावी, अशी मागणीदेखील शर्मा यांनी यावेळी मांडली.
दरम्यान, शर्मा यांची मागणी मान्य झाली आहे, असे म्हणता येईल. कारण आज राज्यसभेत गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, एनआरसी प्रकल्प आता संपूर्ण देशभरात सुरु होईल. त्यामध्ये आसामचादेखील समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आसाम हे राज्यदेखील राष्ट्रीय एनआरसीचा भाग असेल.
Himanta Biswa Sarma, Finance Minister of Assam on National Register of Citizens: Assam state BJP and govt are of the opinion that the NRC prepared under the supervision of Supreme Court by State Coordinator Prateek Hajela has failed to fulfill the aspirations the people of Assam. pic.twitter.com/jyIGSZUWu8
— ANI (@ANI) November 20, 2019
Assam Minister HB Sarma on NRC:There were various lacunae that we've already pointed out. Various social orgs of Assam have filed petitions in SC seeking review of the present process. We are of the view the present NRC should be scrapped&we should be part of national NRC process
— ANI (@ANI) November 20, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
ठाणे
जॅाब माझा
जळगाव
Advertisement