Jhansi Ki Rani Regiment: 'झाशीची राणी रेजिमेंट'ला 78 वर्ष पूर्ण, जाणून घ्या आझाद हिंद सेनेचा इतिहास
Jhansi Ki Rani Regiment: भारतात असलेली ब्रिटशांची सत्ता उलथून लावण्यात राणी लक्ष्मीबाई यांचा मोलाचा वाटा आहे. ज्यामुळे राणी लक्ष्मीबाई अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरल्या आहेत.
'झाशीची राणी रेजिमेंट'च्या (Jhansi Ki Rani Regiment) प्रशिक्षणाला आज 78 वर्ष पूर्ण झाली आहेत. 'झाशीची राणी रेजिमेंट'च्या प्रशिक्षणाला 23 ऑक्टोबर 1943 रोजी सिंगापूर येथे सुरुवात झाली. ही आझाद हिंद सेनेची (Azad Hind Sena) स्त्रियांची तुकडी होती. याचा उद्देश वसाहतवादी ब्रिटिश राज्याला उलथवून टाकण्याचा होता. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या नावाने ही रेजिमेंट सुरू करण्यात आली.
नेताजी सुभाषचंद्रांनी स्वतः याची घोषणा केली होती. यामध्ये सहभागी महिला जास्त प्रमाणात मलयान रबर इस्टेटच्या मूळ भारतीय अशा युवा स्वयंसेवक होत्या. यातील फार कमी स्त्रीया प्रत्यक्ष भारतात येऊ शकल्या होत्या. सुरुवातीलाच सुमारे 170 कॅडेट्स सोबत प्रशिक्षणास सुरुवात झाली होती. यांना प्रशिक्षणानुसार रॅंक देण्यात आल्या होत्या. यांनतर बँकॉक व रंगून येथे देखील तुकड्या तयार झाल्या व युनिटमध्ये तीनशेपेक्षा जास्त कॅसेट्स होते.
इतिहास-
नेताजी सुभाषचंद्र 1943 मध्ये जर्मनी सोडून जपानला पोहोचले. तेथून ते सिंगापूरला गेले आणि कॅप्टन मोहन सिंग यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद फौजची कमांड घेतली. त्यावेळी ते रास बिहारी बोस आझाद हिंद फौजचे लीडर होते. नेताजींनी सैन्याची पुनर्रचना केली आणि महिलांसाठी 'राणी झाशी रेजिमेंट' ची स्थापना केली. सुभाषचंद्र बोस 12 जुलै 1943 रोजी सिंगापूरमधील एका सभेत त्यांचे विचार मांडत होते, ज्यामध्ये अनेक देशांतील सुमारे 25 हजार महिलांचा समावेश होता. त्याच बैठकीत महिला रेजिमेंटची घोषणा करण्यात आली. 15 जुलै 1943 रोजी 20 महिला सैनिकांनी महिन्याच्या अखेरीस राणी झाशी रेजिमेंटमध्ये 50 महिलांची भरती करण्यात आली. डॉ. लक्ष्मी स्वामीनाथन त्या रेजिमेंटचे पहिले कॅप्टन झाल्या. यानंतर, ऑगस्ट 1943 मध्ये 500 महिलांची लष्करी प्रशिक्षणासाठी निवड झाली. यातून राणी झाशी रेजिमेंटसाठी केवळ 150 महिला सैनिकांची निवड करण्यात आली. नेताजींनी 22 ऑक्टोबर 1943 रोजी राणी झाशी रेजिमेंटची घोषणा केली. या रेजिमेंटमध्ये एक हजारांपर्यंत महिला सामील झाल्या होत्या.
भारतात असलेली ब्रिटशांची सत्ता उलथून लावण्यात राणी लक्ष्मीबाई यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी अदम्य साहस दाखवून रणांवर पराक्रम गाजवला. ज्यामुळे राणी लक्ष्मीबाई अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरल्या आहेत.