एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईत 10 हजार कोटींच्या प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईतील 10 हजार 947 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर एमयूटीपी 3 म्हणजे मुंबई नागरी परिवहन प्रकल्प फेज 3 ला मोदींनी परवानगी दिली आहे. मुंबईतील महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च 8 हजार 679 कोटी रुपये असून पाच वर्षांच्या काळात हा खर्च 10 हजार 947 कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.
वाढत्या गर्दीमुळे पनवेल-कर्जत या 28 किमी पट्ट्यात नवा उपनगरी मार्ग, ऐरोली-कळवा या तीन किलोमीटर मार्गाचा एलिव्हेटेड कॉरिडॉर, विरार-डहाणू रोड या 63 किमी मार्गाचं चौपदरीकरण, 565 नवीन कोचेसची खरेदी इत्यादी गोष्टींचा समावेश यात होतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement