एक्स्प्लोर
Advertisement
सप्टेंबरपर्यंत काळा पैसा जाहीर करा, ही शेवटची संधी, मोदींचा इशारा
नवी दिल्ली : काळ्या पैशाबाबत सरकार गंभीर असल्याचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा सांगितलं. ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, त्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत जाहीर करावं, अन्यथा त्यानंतर मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागेल, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी काळा पैसा ठेवणाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.
पंतप्रधान मोदी आज ‘मन की बात’मध्ये बोलताना म्हणाले, “ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, त्यांना भारत सरकारने एक संधी दिली आहे की, आपली अघोषित संपत्ती 30 सप्टेंबरपर्यंत जाहीर करावी. अघोषित संपत्ती जाहीर करण्यासाठी विशेष सुविधाही सरकारने सादर केली आहे. ठराविक दंड भरुन काळ्या पैशाच्या संकटातून मुक्त होऊ शकता.”
“जे लोक आपल्याकडील काळा पैसा स्वत:हून जाहीर करतील, त्यांना कोणत्याही चौकशीला सामोरं जावं लागणार नाही, हे माझं वचन आहे. एवढी संपत्ती कुठून आली, कशी आली, याबाबत विचारलंही जाणार नाही. त्यामुळे हीच मोठी संधी असून, पारदर्शक कारभाराचा भाग बना.”, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
निवडणूक
Advertisement