एक्स्प्लोर

ओला-उबरने प्रवास करणं होऊ शकतं स्वस्त; सरकार लागू करणार नियमावली

प्रवाशांची होणारी लूट थांबवण्यासाठी केंद्र परिवहन मंत्रालय ओला-उबरसारख्या टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक योजना आमंलात आणण्याच्या तयारीत आहे. ही योजना राबवण्यासाठी लवकरच नियमावली लागू केली जाणार आहे.

मुंबई : अनेकदा ओला-उबर यांसारख्या कॅब एग्रीगेटर्स कंपन्या ग्राहकांकडून अवाच्या सव्वा भाडं वसूल करत असल्याचं आपण ऐकत असतो. यासाठीच आता केंद्र सरकार पाऊल उचलणार आहे. त्यामुळे ओला उबरने प्रवास करणाऱ्या ग्राहकांचा प्रवास स्वस्तात होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रवाशांची होणारी लूट थांबवण्यासाठी केंद्र परिवहन मंत्रालय ओला-उबरसारख्या टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक योजना आमंलात आणण्याच्या तयारीत आहे. ही योजना राबवण्यासाठी लवकरच नियमावली लागू केली जाणार आहे. या नियमावलीतंर्गत कंपन्या एकूण प्रवासी भाड्याच्या फक्त 10 टक्केच कमिशन प्राप्त करू शकणार आहेत. सध्या या कंपन्या एकूण प्रवासी भाड्यावर 20 टक्के कमिशन वसूल करत आहेत. कॅब एग्रीगेटर्स कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रथमच योजना आमलात आणली जात आहे. जर सरकारचा हा नियम लागू करण्यात आला, तर कॅब एग्रीगेटर्स कंपन्यांच्या उत्पादनावर नियंत्रण ठेवणं शक्य होणार आहे. त्यामुळे ओला-उबरने प्रवास करणं स्वस्त होणार आहे. एवढच नाहीतर, या कंपन्यांच्या मनमानी कारभारावरही वचक बसणार आहे. भाडेवाढिच्या मुद्यावर केंद्र सरकारकडून एकूण भाड्यावर दुप्पट नियंत्रण आणण्याचा निर्णय घेण्यात येणाची शक्यता आहे. तसेच प्रत्येक राज्यांकडून तळभाडे निश्चित करण्यात येणार आहे. कंपन्यांकडून प्रत्येक तीन महिन्यांनी आढावा घेण्यात येणार आहे. तसेच ओला-उबरच्या चालक दिवसभरात जो व्यवसाय करतील त्या एकूण व्यवसायाच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त भाडे आकारले जाणार नाही, याचीही दक्षता नव्या नियमावलीत घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. ओला आणि उबर कॅब कॅन्सल किंवा एखाद्या ट्रिपसाठी ड्रायवर नकार देणं यांसारख्या तक्रारींवर नियंत्रण ठेवण्यासाठीही कडक नियमावलीची तरतूदही करण्यात येणार आहे. या प्रस्तावातंर्गत कॅब ड्रायव्हरने राइड कॅन्सल केल्यास त्यावर एकूण प्रावासी भाड्याच्या 10 ते 15 टक्क्यांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. हाच नियम ग्राहकांनाही लागू करण्यात येणार आहे. जर एखादा ग्राहक कॅब बुक केल्यानंतर चुकीच्या कारणांमुळे कॅन्सल करत असेल तर ग्राहक किंवा चालकावरही 10 ते 50 टक्क्यांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. कॅब एग्रीगेटर्स नियमांच्या मसुद्यानुसार, ग्राहकांना 5 लाख रूपयांपर्यंतचे विमा संरक्षण देण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला आहे. तसेच यामध्ये कॅब चालकाची योग्य आणि नियमित बायोमॅट्रिक पडताळणी यांसारख्या तरतूदिंचाही समावेश करण्यात आला आहे. दरम्यान पहिल्यांदाच सरकार कॅब एग्रीगेटर्सच्या कमिशनवर शुल्क आकारणे किंवा वाढीव किंमत यांसारख्या महत्वाच्या विषयांसंदर्भात नियमावली लागू करणार आहे. कॅब एग्रीगेटर्स नियमावली लागू करण्याआधी सरकार यासंदर्भात लोकांच्या सुचना मागवणार आहे. त्यासाठी पुढिल आठवड्यात मसुदा जारी केला जाणार आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली. तसेच या कंपन्यांबाबत तयार केलेल्या नियमांची मोटर वाहन कायदा 2019 अंतर्गत नोंदणी केली जाणार असून, हा कायदा 1 सप्टेंबर रोजी अस्तित्वात आला आहे. या नियमांची वर्षाच्या अखेरीस अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. या नियमांमध्ये प्रवासी भाड्यावर नियंत्रण ठेवण्यासोबत चालक आणि प्रवाशांची सुरक्षा, चालक आणि कंपन्यांवरील दंड, तसेच कंपन्यांसाठी परवान्यांच्या निकषाचा समावेशही करण्यात येणार आहे. संबंधित बातम्या :  सहा महिन्यांपासून बंद असलेले ट्विटर अकाउंट्स डिलीट होणार OnePlus कंपनीला भारतात 5 वर्ष पूर्ण; 7 हजारापर्यंत मिळू शकते सवलत

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : मेलोनींवर कमेंट, राहुल गांधींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
मेलोनींवर कमेंट, राहुल गांधींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Census 2027: जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; पाहा संपूर्ण यादी!
जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; पाहा संपूर्ण यादी!

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget