एक्स्प्लोर
देशभरात लक्ष्मीपूजन संपन्न, बीएसईमध्ये मुहूर्त ट्रेडिंग

मुंबई : शेअर बाजारात संवत्सर 2073 चं जंगी स्वागत करत मोठ्या दणक्यात लक्ष्मीपूजन करण्यात आलं. संध्याकाळी झालेल्या व्यवहारात निर्देशांकाने 154 अंकांची उसळी घेत 28,000 अंकांची पातळी गाठली.
पहिल्या पाच मिनिटातच शेअर बाजारनं थेट 154 अंकांनी उसळी घेतली. ल्यूपिन, विप्रो, सन फार्मा, अॅक्सिस बँक, एम अँड एम, टाटा स्टील, ओएनजीसी, सिपला, एशियन पेंट, मारुती या कंपन्यांना सर्वाधिक मागणी होती.
देशभरात मोठ्या भक्तीभावानं लक्ष्मीपूजन संपन्न झालं. अनेकांनी धन, लक्ष्मी देवतेची मनोभावे आराधना केली. व्यापाऱ्यांकडून चोपड्यांची पूजा करुन नववर्षाला सुरुवात झाली.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























