एक्स्प्लोर
VIDEO: जवानांच्या गाडीसमोर उभं राहून दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या

जम्मू: जम्मू-काश्मीरच्या पम्पोरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. पम्पोरमधील एका नागरिकानं हा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केला आहे. या व्हिडिओमध्ये सीआरपीएफ जवानांच्या बसजवळ उभा राहून दहशतवादी फायरींग करताना स्पष्ट दिसत आहे. दोन मिनिट चाललेल्या या गोळीबाराचा आवाजही मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाला आहे. यावरुन हल्ल्याची तीव्रता स्पष्ट होते आहे. दहशतवाद्यांच्या या गोळीबारात जवानांच्या गाडीच्या काचा फुटत असल्याचं दिसतं आहे. हा हल्ल्यात सीआरपीएफचे 8 जवान शहीद झाले आहेत तर 17 जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्याला प्रत्युत्तर देत आपल्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. मात्र जवानांच्या गाडीच्या इतक्या जवळ येऊन केलेल्या हल्ल्याचं मोबाईल शुटिंग आता समोर आलं आहे. VIDEO: (1.02 ते 1:47 या टाईमलाइनवर हा व्हिडिओ पाहता येईल)
Before You Go
Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके




















