एक्स्प्लोर

गोव्यात काँग्रेसच्या दहा आमदारांचा गट भाजपमध्ये विलीन

काँग्रेसचे पंधरापैकी दहा आमदार फुटून भाजपमध्ये सहभागी झाल्यामुळे हे सर्व पक्षांतरबंदी कायद्यातून बचावणार असल्याचे मानले जात आहे. पंधरापैकी दहा म्हणजे दोन तृतीयांश आमदार फुटल्याने आमदारकीचा राजीनामा द्यावा लागत नाही किंवा पोटनिवडणुकीलाही सामोरे जावे लागत नाही.

पणजी : गोव्यात विरोधी पक्ष काँग्रेसची धार कमी करुन भाजप सरकार भक्कम करण्याच्या झालेल्या हालचालींमुळे गोवा पुन्हा एकदा चर्चेत आले. काँग्रेस पक्षाच्या पंधरापैकी दहा आमदारांनी बुधवारी रात्री काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या दहा आमदारांनी आपण पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले. विरोधी पक्षनेते फुटण्याची गोव्याच्या राजकारणातील ही दुसरी घटना ठरली आहे. काँग्रेसचे पंधरापैकी दहा आमदार फुटून भाजपमध्ये सहभागी झाल्यामुळे हे सर्व पक्षांतरबंदी कायद्यातून बचावणार असल्याचे मानले जात आहे. पंधरापैकी दहा म्हणजे दोन तृतीयांश आमदार फुटल्याने आमदारकीचा राजीनामा द्यावा लागत नाही किंवा पोटनिवडणुकीलाही सामोरे जावे लागत नाही. दहा आमदारांमध्ये कवळेकर यांच्यासह नीळकंठ हळणकर, इजिदोर फर्नांडिस, फिलीप नेरी रॉड्रिग्ज, फ्रान्सिस सिल्वेरा, टोनी फर्नांडिस, बाबूश मोन्सेरात, विल्फ्रेड डिसा उर्फ बाबाशान, जेनिफर मोन्सेरात, क्लाफास डायस यांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे, लुईझिन फालेरो, रवी नाईक, दिगंबर कामत आणि अॅलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे तेवढे काँग्रेसमध्ये राहिले आहेत. नव्या सरकारमध्ये बाबू कवळेकर हे उपमुख्यमंत्रिपदी असू शकतील. त्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याची ग्वाही भाजपाने दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले. कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप आमदारांचा गट फुटण्यास गेल्या महिन्यात तयार झाला होता पण भाजपच्या स्तरावरुन निर्णय झाला नव्हता. भाजपचे गोवा प्रभारी बी. एल. संतोष हे गेले दोन दिवस गोव्यात आहेत. भाजपच्या अत्यंत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बुधवारी संध्याकाळी पणजीमध्ये बैठक झाली. त्यावेळी काँग्रेसच्या सर्व दहा आमदारांनी पक्षापासून फारकत घ्यावी आणि स्वतंत्र गट स्थापन करुन मग भाजपमध्ये विलीन व्हावे अशा प्रकारचा निर्णय झाला. कवळेकर यांनीही त्याचवेळी स्वतंत्रपणे काँग्रेसच्या काही आमदारांची बैठक घेतली. काँग्रेसच्या आमदारांपैकी काही जणांना मंत्रिपदे देण्यासाठी विद्यमान मंत्र्यांपैकी काही जणांना वगळले जाईल, अशीही माहिती भाजपच्या गोटातून प्राप्त झाली. काँग्रेसपासून फुटून वेगळे झालेले सर्व आमदार दिल्लीस रवाना झाले असून ते पक्षाध्यक्ष आणि इतर प्रमुख नेत्यांना भेटणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
Mallikarjun Kharge : प्रधानांचा राजीनामा घेऊन मोदींनी खुर्ची वाचवली, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जसाठी अमित शाहांनी राजीनामा द्यावा : मल्लिकार्जुन खरगे
अमित शाहांनी राजीनामा द्यावा, ते देत नसतील तर मोदींनी त्यांना हटवावं: मल्लिकार्जुन खरगे

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gunratna Sadavarte : आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
Pune Crime News: बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Mallikarjun Kharge : प्रधानांचा राजीनामा घेऊन मोदींनी खुर्ची वाचवली, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जसाठी अमित शाहांनी राजीनामा द्यावा : मल्लिकार्जुन खरगे
अमित शाहांनी राजीनामा द्यावा, ते देत नसतील तर मोदींनी त्यांना हटवावं: मल्लिकार्जुन खरगे
Kalyan Court Summons Uddhav Thackeray And Eknath Shinde: उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंनाही कल्याण कोर्टाने समन्स धाडलं; दोघांनाही हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंनाही कल्याण कोर्टाने समन्स धाडलं; दोघांनाही हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
मुंबई महापालिकेतील जलमापक सुपरवायजरला 40 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; तक्रारीनंतर एसीबीने रचला सापळा
मुंबई महापालिकेतील जलमापक सुपरवायजरला 40 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; तक्रारीनंतर एसीबीने रचला सापळा
Vidarbha Rain: विदर्भात पावसाचे थैमान! पुरामुळे गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला, तर अमरावतीच्या मेळघाटात पावसाचं रौद्ररूप, 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला
विदर्भात पावसाचे थैमान! पुरामुळे गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला, तर अमरावतीच्या मेळघाटात पावसाचं रौद्ररूप, 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला
OTT Trending Movie: 100 कोटींच्या पौराणिक चित्रपटाचा OTTवर दबदबा;  'बॉक्स ऑफिसवर अपयशी, आता मिळवतोय प्रेक्षकांची पसंती
100 कोटींच्या पौराणिक चित्रपटाचा OTTवर दबदबा;  'बॉक्स ऑफिसवर अपयशी, आता मिळवतोय प्रेक्षकांची पसंती
Embed widget