एक्स्प्लोर
युवकाला उडवून कार सुसाट, तीन किमीपर्यंत मृतदेह टपावरच

हैदराबाद : भरधाव वेगात आलेल्या एका गाडीने युवकाला धडक दिली, धडकेत मृतदेह उडून गाडीच्या टपावर पडला. त्यानंतरही उद्दाम चालकाने गाडी तशीच दामटवत तीन किलोमीटर प्रवास केला. तेलंगणातील मेहबूबनगरमध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली. 35 वर्षीय कामगार श्रीनिवासुलू रात्री दहाच्या सुमारास रस्ता ओलांडत होता. त्याच वेळी शेव्हरोले कंपनीच्या एका कारने त्याला धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती, की तो उडून त्याच गाडीच्या टपावर पडला. अपघातामुळे घाबरलेल्या चालकाने कार थांबवण्याऐवजी वेगात सुरु केली. कामगाराचा मृतदेह टपावर त्याच अवस्थेत असताना जवळपास तीन किलोमीटरचे अंतर कारने पार केले. त्यानंतर काही दुचाकीस्वारांनी त्याला हटकलं आणि पोलिसांना माहिती दिली. स्थानिक आणि पोलिसांनी कारचालकाला थांबवलं, मात्र पळून जाण्यात त्याला यश आलं. पोलिसांच्या माहितीनुसार हैदराबादचे व्यावसायिक राजशेखर यांच्या नावाने कारची नोंद आहे.
Before You Go
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















