एक्स्प्लोर
तेलंगणात भीषण अपघात, बस दरीत कोसळून 45 मृत्यूमुखी
सरकारने अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
जगतियाल : तेलंगणाच्या जगतियालमध्ये आज झालेल्या भीषण अपघातात 45 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्य परिवहन मंडळाची बस कोंडागट्टू घाटाजवळ दरीत कोसळल्याने हा अपघात झाला. अपघातात अनेक लोक जखमी झाल्याचं कळतं. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचावकार्य सुरु आहे. बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे.
जगतियालच्या पोलिस अधीक्षक सिंधु शर्मा यांनी अपघातात 45 जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्या म्हणाल्या की, "आतापर्यंत 45 जण मृत्यूमुखी पडले आहेत. जखमींना उपचारांसाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बचावकार्य सुरु आहे."
अपघातावेळी तेलंगणा राज्य रस्ते परिवहन मंडळ (टीएसआरटीसी) च्या बसमध्ये एकूण 62 जण प्रवास करत होते. ही बस कोंडागट्टूच्या हनुमान मंदिरावरुन जगतियाल जात होती. रस्त्यावर उतार होता. या रस्त्यावर वळण घेताना बसचा ब्रेक फेल झाला आणि बस दरीत कोसळली. दरीत कोसळण्याआधी बस आधी चार वेळा पलटली होती. जगतियालच्या जिल्हाधिकारी शरत हे देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी अपघातावर शोक व्यक्त केला आहे. जखमींना चांगले उपचार देण्याचे आदेश त्यांनी दिली आहे. तर सरकारने अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.#UPDATE: Sindhu Sharma, SP Jagtial, says, "45 people have died so far. Injured have been admitted to nearby government hospitals. Rescue operation is underway." A state-run RTC bus accident had occurred near Kondaagattu, earlier today. #Telangana pic.twitter.com/VRW1Q8FaCC
— ANI (@ANI) September 11, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement